मुंबई: दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संस्थापक वाधवान बंधूंना खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणारे राज्याचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

अमिताभ गुप्ता यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून वाधवान बंधूना महाबळेश्वरला जाण्यासाठी साह्य केल्याचे समोर आल्यानंतर सरकारने त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली आहे. याप्रकरणी गृहमंत्री यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गुरुवारी रात्री उशिरा चर्चा केली. त्यानंतर गुप्ता यांना सक्तीच्या पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

याप्रकरणी गृहमंत्र्यांनी आधीच चौकशीचे आदेश दिलेले असून ही चौकशी पूर्ण होईपर्यंत गुप्ता यांना सक्तीच्या रजेवरच रहावे लागणार आहे. ही कारवाई करताना कायदा सर्वांसाठी समान आहे, असेही गृहमंत्री देशमुख यांनी नमूद केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here