मुंबई : तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता, डान्सर टायगर श्रॉफला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. टायगर जितका डान्स फ्लोअरवर थिरकतो तितकाच तो सिनेमातील अॅक्शन सीनमध्येही टाळ्या शिट्ट्या घेतो. टायगरची सिग्नेचर स्टेप करण्यासाठी नेटकरी नेहमीच आतूर असतात. पण जेव्हा बॉलिवूडचे अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांनाही टायगरने हिरोपंती टू या त्याच्या बहुचर्चित सिनेमातील हाय किक अॅक्शन स्टेप करण्याचा मोह होतो, तेव्हा ही गोष्ट टायगरसाठी शंभरनंबरी सोनंच ठरते. वयाच्या ७९ व्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी टायगरसारखी हाय किक अॅक्शन स्टेपचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या वयातील बिग बी यांचा उत्साह बघून टायगरला आनंदही झालाय आणि घामही फुटला आहे.

टायगर श्राॅफ

हिरोपंती १ या सिनेमाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता या सिनेमाचा सिक्वेल येतोय. हिरोपंती टू या सिनेमात टायगर श्रॉफचे अॅक्शन सीन खचाखच भरले आहेत. टायगरच्या डान्सवर जसे त्याचे चाहते फिदा आहेत तसेच त्याच्या फायटिंग सीनलाही डोक्यावर घेणारे चाहते काही कमी नाहीत. टायगर हा सोशल मीडियावरही खूपच अॅक्टिव्ह असतो. जिममधले व्यायामाचे व्हिडिओ आाणि फोटो पोस्ट करून टायगर चाहत्यांचे लाखो लाइक्स कमावतो. हिरोपंती २ या सिनेमात टायगरने केलेल्या हाय किक अॅक्शन स्टेपप्रमाणे आपणही टायगरची ही सिग्नेचर स्टेप करावी असं बिग बी यांच्या मनात आलं आणि त्यांनी ही स्टेप करत फोटो पोस्टही केले आणि टायगरला टॅगही केले.

प्रियांकाने मुलीचं नाव मालती का ठेवलं? जाणून घ्या नावाचा अर्थ


या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी असं म्हटलं आहे की, ‘टायगर श्रॉफच्या या अॅक्शन सीनला चाहत्यांकडून लाखो लाइक्स मिळतात. त्यामुळेच मी असा विचार केला की ही स्टेप करून बघावी. मला आशा आहे की मलाही टायगरप्रमाणे लाइक्स मिळतील.’

बिग बी यांनी त्यांच्या काळात अनेक अॅक्शन सिनेमांमध्ये केलेली फायटिंग बघत मोठ्या झालेल्या टायगरला दस्तूरखुद्द बच्चन यांची पोस्ट बघून इतका आनंद झाला की त्यावर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, एका महानायकाकडून माझ्या अॅक्शन स्टेपला फॉलो करण्यासारखी पावती नाही. मला खूपच आनंद झाला आहे. इतक्या मोठ्या कलाकारानं माझं कौतुक करावं हे माझ्यासाठी पदकापेक्षा कमी नाही. खरं तर टायगरला या गोष्टीचा आनंदच झाला पण वयाच्या ७९ वर्षी अमिताभ बच्चन यांनी हाय किक अॅक्शन करताना लावलेली ताकद बघून टायगरला अक्षरश: घामही फुटला.

‘हे पद्मश्रीच्या लायकीचे आहेत का?’ अक्षय, शाहरुख,अजयच्या तंबाखू जाहिरातीवर आक्षेप

बिग बी यांच्या इन्स्टापोस्टवर रकुल प्रीत सिंह, अभिषेक बच्चन, हुमा कुरेशी यांच्याबरोबरच अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिनेही कमेंट केली आहे. २४ एप्रिलला हिरोपंती टू हा सिनेमा रिलीज होणार असल्याने टायगर प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या हिरोपंती २ या सिनेमाची जितकी चर्चा आहे त्यापेक्षा जास्त चर्चा रंगली आहे ती बिग बी यांच्या हिरोपंती स्टाइल हाय किक अॅक्शनची.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here