उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळीजवळ राष्ट्रीय महामार्गावर एक विचित्र अपघात झाल्याने दोघांचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या अपघातामध्ये एक महिला, एक पुरुष आणि एक गाय यांचा मृत्यू झाला आहे तर उस्मानाबाद परिवहन विभागाचे दोन आरटीओ अधिकारी जखमी झाले आहेत.
या अपघातात महिला निर्मला गोळे यांचा जागीच मृत्यू झाला तर उस्मानाबाद एसटी विभागाचे वाहतूक नियंत्रक बाळासाहेब बाबुराव काळे यांचा उपचारादरम्यान उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. तर अपघातातील इतर जखमींना उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.