अहमदनगर : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या विरोधात पाच कोटीचा खंडणीचा गुन्हा मुंबई इथे दाखल केला. त्यावर धनंजय मुंडे यांनी अहमदनगर इथे पत्रकारांशी बोलनं टाळलं. मात्र, शिंदोरी इथे संत भगवान बाबा यांच्या सप्ताहात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, ‘बाबांचे दर्शन घेतले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही भगवान बाबा यांची पुण्याई आहे.’
यावेळी बोलताना म्हणाले ते म्हणाले की , बोलण्यासाठी व्यासपीठ भरपुर आहेत. पण बाबा महाराजांनी ( नामदेव शास्त्री ) आदेश दिला म्हणून बोलतो. काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही भगवान बाबा यांची पुण्याई आहे, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे.