पीएमपीच्या बस पुरवठादार ठेकेदारांनी मध्यरात्रीपासून अचानक संप पुकारला आहे. त्यामुळे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. याबाबत पीएमपी प्रशासनाला कोणतीही पूर्व कल्पना देण्यात आलेली नव्हती.

 

Pune News
मोठी बातमी! पीएमपीच्या बस पुरवठादार ठेकेदारांचा संप, शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली

हायलाइट्स:

  • पीएमपीच्या बस पुरवठादारांचा मध्यरात्रीपासून संप
  • ठेकेदारांची थकीत ५८ कोटी रुपयांची बिले केली अदा
  • ठेकेदारांनी दबाव तंत्राचा अवलंब केल्याचा पीएमपी प्रशासनाचा दावा
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून बस ठेकेदारांची बिले थकली होती. त्यामुळे ठेकेदार पीएमपीकडे बिलांची मागणी करत होते. त्यानुसार पीएमपी प्रशासनाने गुरुवारी, २१ एप्रिलला ठेकेदारांची थकीत ५८ कोटी रुपयांची बिले अदा केली आहेत. मात्र, त्यानंतरही ठेकेदारांनी अचानक संप पुकारला आहे. पीएमपीच्या १४०० ते १५०० बस मार्गावर असतात त्यापैकी ६५० बस ठेकेदारांच्या असतात, त्यात इ बसचाही समावेश आहे.

दबावतंत्राचा भाग?…

ठेकेदारांच्या बस वरील चालकांनी पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे ठेकेदारांबाबत तक्रार केली होती. त्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी किंवा अन्य कोणतीही सुविधा दिली जात नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार मिश्रा यांनी सर्व रेकॉर्ड तपासण्याचा आदेश दिला होता. या विषयात पीएमपी प्रशासनाने लक्ष घालू नये, यासाठी ठेकेदारांनी दबाव तंत्राचा अवलंब केल्याचा पीएमपी प्रशासनाचा दावा आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : strike by the pmps bus supply contractors disrupted the city’s public transport system
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here