Live अपडेट्स…
>> देशातील करोनाग्रस्तांची संख्या ५,८०० वर पोहोचली. गेल्या २४ तासांमध्ये ५४९ नवे रुग्ण आढळले. तर, आतापर्यंत १६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
>> दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लागण. गंगाराम रुग्णालयातील एकूण ११४ जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे.
>> दिल्लीत करोनाचे आणखी ५१ नवे रुग्ण आढळले. या पैकी ४ रुग्ण मरकझशी संबंधित आहेत. दिल्लीत एकूण रुग्णांची संख्या झाली आहे ७२०.
>> देशात करोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात. दिवसभरात महाराष्ट्रात २२९ नवे रुग्ण आढळले. तर राज्यात २५ रुग्णांचा मृत्यू झाला. या बरोबरच महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या पोहोचली आहे १३६४ वर.
>> नमस्कार, देशभरातील करोनाची स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी वाचा लाइव्ह अपडेट्स…
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times