मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) हे मुंबईत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. राणा यांच्या युवा स्वाभिमानी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा दावा केला आहे. राणा दाम्पत्य आणि संघटनेचे ५०० ते ७०० पदाधिकारी मुंबईत दाखल झाल्याची माहिती आहे. नवनीत राणा आणि रवी राणा हे विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईत येणार होते. मात्र, शिवसेनेने बडनेरा आणि मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकावर सकाळपासूनच ‘फिल्डिंग’ लावून ठेवली आहे. राणा दाम्पत्याला विरोध करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने सीएसएमटी स्थानकावर जमले होते. या शिवसैनिकांना चकवा देऊन राणा दाम्पत्य विमानाने मुंबईत दाखल झाल्याची माहिती आता समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही खात्रीशीर वृत्त नाही. नवनीत राणा आणि रवी राणा हे सध्या अमरावतीमधील त्यांच्या घरीही नाहीत. त्यामुळे राणा दाम्पत्य येथून बाहेर पडल्यानंतर नेमके कुठे गेले आहे, याबाबत अद्याप संभ्रम आहे. (Shivsena workers gathers outside Matoshree to oppose MP Navneet Rana)
Navneet Rana vs Shivsena: नवनीत राणांना रोखण्यासाठी CSMT स्थानकावर शिवसैनिकांची ‘फिल्डिंग’
युवा स्वाभिमानी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, सध्या संघटनेचे ५०० ते ७०० कार्यकर्ते मुंबईत आहेत. याशिवाय, धुळे, नागपूर आणि वर्धा येथूनही संघटनेचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे आता उद्या मुंबईत काय घडणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

तर दुसरीकडे राणा दाम्पत्याकडून गनिमी काव्याचा वापर करून मातोश्रीच्या परिसरात प्रवेश होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन आतापासूनच याठिकाणी शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन दाखवावेत, आम्ही सज्ज आहोत, असे आव्हान शिवसैनिकांकडून देण्यात आले आहे. राणा दाम्पत्य कधीही याठिकाणी येईल, ही शक्यता गृहीत धरून शिवसैनिक आजपासूनच मातोश्रीबाहेर पहारा देण्याची शक्यता आहे.
हिंमत असेल तर येऊनच दाखवा, शिवसेनेचं नवनीत राणांना आव्हान; मातोश्रीबाहेरील सुरक्षेत वाढ

पोलिसांनी ‘मातोश्री’ची सुरक्षा वाढवली

नवनीत राणा उद्या सगळ्यांना चकवा देत मातोश्रीपर्यंत पोहोचल्या तरी मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळू शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी मातोश्रीबाहेरील बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री मातोश्रीच्या समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग केली आहे. तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here