अमरावती : जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू आहे. हनुमान चालीसा आणि पुण्याच्या राजकारणावरून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षामध्ये सक्रिय भूमिका असलेले आणि मुस्लिम कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यामुळे अल्पसंख्यांक शेळीच्या जिल्हाध्यक्षासह तब्बल अकरा महत्त्वाच्या पदावरील पदाधिकाऱ्यांनी खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

पत्रकार भवनात दिला राजीनामा

युवा स्वाभिमान पक्षाला सोडचिठ्ठी देण्यासाठी काल अमरावती येथील श्रमिक पत्रकार भवनात अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अयुब खान मुस्तफा खान यांच्यासह अकरा महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यावेळी बोलताना आयुब खान म्हणाले की, आम्ही चार वर्षांपूर्वी युवा स्वाभिमान पक्षासोबत बोललो होतो धर्मनिरपेक्ष विचार शोषित पीडित वंचित आणि बहुजनांसाठी काम करणारा हा पक्ष. म्हणून आम्ही आमचा वेळ व मेहनत या पक्ष्यासाठी खर्च केला. युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी विविध स्तरावर काम केले त्याचा फायदा पक्षाला सुद्धा झाला आहे.

Navneet Rana vs Shivsena: मातोश्रीबाहेर शिवसैनिकांचा पहारा, नवनीत राणा-रवी राणा विमानाने मुंबईत दाखल
११ महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा…

आता खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांची भूमिका बदलली आहे. यामुळेच आम्ही सर्व विचार करून आमच्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले. यामध्ये अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्षसह शहराअध्यक्ष, उपाध्यक्ष जिल्हा सदस्य ज्येष्ठ सदस्य अशा महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिल्याने महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये युवा स्वाभिमान पक्षाला मोठा झटका बसणार,असं बोललं जात आहे.

मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर सचिन तेंडुलकरने दिली पहिली प्रतिक्रिया; सांगितले पराभवाचे कारण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here