असा घडला सर्व प्रकार…
पोलिसात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, १० एप्रिल २०२२ दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास वीरभान भिकन पाटील हे पारोळा शहरातील नगरपालिका चौकात भाजीपाला घेत होते. त्याचवेळी तिथे एक अनोळखी व्यक्ती आला आणि विरभान यांच्याजवळ जाऊन म्हणाला की, मी तुम्हाला चांगले ओळखतो. माझे लग्न आहे, मला तुमच्या बोटातील अंगठी सारखी अंगठी बनवायची आहे. ती तुम्ही मला काढुन दाखवा. त्यानंतर वीरभान यांनी त्या अनोळखी व्यक्तीला २१ हजारांची सोन्याची अंगठी काढुन दाखवली. त्यावर तो अनोळखी व्यक्ती त्यांना म्हणाला की, मी सोनाराला दाखवुन येतो.
पुढील तपास पोलीस करत आहेत…
बराच वेळ वीरभान यांनी अनोळखीची वाट बघितली. परंतू तो परत आला नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वीरभान पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक-योगेश जाधव हे करीत आहेत.