सोलापूर: मोहोळ पंढरपूर आळंदी पालखी महामार्गावर मोहोळच्या दिशेने चुकीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या लक्झरी बसने बोलेरो जीपला समोरा समोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात नवरी सोडण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सारोळे (ता. मोहोळ) येथे २२ एप्रिल रोजी रात्री १ वाजता झाला असून अपघातामध्ये मयत झालेले दोन्ही युवक पळशी व सुपली (ता. पंढरपूर) येथील रहिवाशी आहेत.

असा झाला भीषण अपघात…

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळशी (ता. पंढरपूर) येथील अरुण भानुदास केंगार (वय-३५) व सुपली येथील सुरेश बबन भोसले (वय-३०) या दोघांनी गावातीलच बाळू वाघमारे यांची बोलेरो जीप क्रमांक एम एच १३ ए झेड ३८६९ ही घेऊन, सोलापूर येथे नवरी सोडण्यासाठी गेले होते. या दोघांनी सोलापूर येथील हळदीचा कार्यक्रम व जेवण करून सोलापूर येथून रात्री बारा वाजता गावाकडे परतत असताना मध्यरात्री एक वाजता सारोळे (ता. मोहोळ) येथील लादे वस्तीजवळ आले असता समोरून चुकीच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या लक्झरी बस क्रमांक ए आर ०६ ए ८४१७ ने जोराची धडक दिली. या झालेल्या अपघातामध्ये पळशी (ता. पंढरपूर) येथील अरुण भानदास केंगार (वय-३५) व सुपली येथील सुरेश बबन भोसले (वय-३०) या दोघांच्या डोक्यास मार लागून जागीच मयत झाले.

Sanjay Raut: नवनीत राणा भाजपच्या हिंदुत्वाच्या नौटंकीमधलं पात्र, निव्वळ स्टंटबाजी करतायत: संजय राऊत
लक्झरी बसचा चालक फरार…

या भयानक अपघातामध्ये बोलेरो गाडीचा जागीच चक्काचूर झाला असून लक्झरी बसचेही मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान लक्झरी बसचा चालक वाहन सोडून पळून गेला असल्याची फिर्याद नवनाथ भानदास केंगार रा. पळसी (ता. पंढरपूर) यांनी दिली असून यानुसार मोहोळ पोलिसांनी लक्झरी बसचा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपघात पथकाचे प्रमुख अविनाश शिंदे व सहाय्यक फौजदार ज्योतिबा पवार हे करीत आहेत.

दमदार फीचर्ससह भारतात लाँच झाली ‘ही’ स्मार्टवॉच, ७ हजाराची स्मार्टवॉच २ हजारात खरेदीची संधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here