मॅक्सर कंपनीनं जारी केलेल्या सॅटेलाईट फोटोमध्ये २०० सामुहिक कबरी दिसून येत आहेत. मॅक्सरन त्या ठिकाणी मार्चमध्ये कबरी खोदल्या गेल्याचं सांगितलं आहे. मारियुपोलचे महापौर वदयम बोयचेंको यांनी रशियन सैन्य त्यांचे युद्ध गुन्हे लपवण्याचा प्रयत्न करत आहे. बोयचेंको यांचे सहकारी पेट्रो यांनी मारियुपोलमध्ये मारले गेलेल्या लोकांना मानहूशमध्ये दफन करण्यात आल्याची माहिती दिली.
पेट्रो यांनी रशियन सैन्यानं मानहूशमध्ये कबरी खोदल्या असून त्या १०० फुट लांबीच्या आहेत. मारियुपोलपासून मानहूश १९ किमी अंतरावर आहे. ट्रकमधून लोकांचे मृतदेह आणि कबरीमध्ये टाकण्यात आले, असा दावा पेट्रो यांनी केला. रशियानं केलेल्या युद्ध गुन्ह्यांचे हे पुरावे आहेत, असं ते म्हणाले.
रशियन सैन्यानं केलेल्या हल्ल्यांमध्ये मारियुपोलमधील २० हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा यूक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मृतांमध्ये लहान मुलं, महिला आणि वृद्ध नागरिकांचा समावेश असल्याचं यूक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. यूक्रेनच्या अंदाजानुसार अजूनही १ लाख लोक मारियुपोलमध्ये असल्याचं म्हटलं. मारियुपोलमधील अजोवस्टल स्टील कंपनी बंद करण्याचे आदेश रशियानं दिले आहेत. अजोवस्टल कंपनीत यूक्रेनचे सैनिक आणि नागरिक थांबले असल्याचा संशय रशियाला आहे.
यूक्रेनचे सैन्य अजोवस्टल कंपनीत असल्यानं रशियाकडून त्या कंपनीवर हल्ला केला जाण्याची शक्यता होती. मात्र, रशियानं त्या कंपनीवर हल्ला करण्याऐवजी औद्योगिक क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या स्टील कंपनीवर हल्ला करणं रशियाला अव्यवहार्य वाटलं. रशियानं मारियुपोलवर ताबा मिळवत ते शहर मुक्त केल्याचा दावा केला आहे.