औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरे सातत्याने बाबासाहेब पुरंदरे यांचं समर्थन करतात. हे निंदाजनक आहे. पुरंदरे यांनी शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांचे चारित्र्याहनन केले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याच्या कटात राज ठाकरेसुद्धा सहभागी आहेत, असा आरोप साहित्यिक श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत ही टीका केली आहे.
राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा मुद्दा असेल तर असावा आमचा काही संबंध नाही. फक्त महाराजांचा अवमान करणाऱ्या लोकांचे तुम्ही समर्थक कसे इतकाच आमचा सवाल आहे असं कोकाटे म्हणाले. तर जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे अधिकार राज ठाकरे यांना कुणी दिले? असंही कोकाटे म्हणाले आहे.