नवी दिल्ली: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. भारतात झालेल्या स्वागतानं भारावलेल्या जॉन्सन यांनी गुजरातमध्ये झालेल्या स्वागतावर भाष्य केलं आहे. गुजरातमध्ये माझं जोरदार स्वागत करण्यात आलं त्यामुळं मी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), अमिताभ बच्चन असल्यासारखं वाटत होतं, असं बोरिस जॉन्सन म्हणाले. नरेंद्र मोंदी (Narendra Modi) हे मित्र असल्याचं सांगत दोन्ही देशांचे संबंध मजबूत झाल्याचं म्हटलं, बोरिस जॉन्सन म्हणाले.

बोरिस जॉन्सन यांनी दोन्ही देशांच्या चर्चेसंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला, यामध्ये भारत दौऱ्यासंदर्भात ते बोलत होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. गुजरातमध्ये झालेल्या स्वागतानं जॉन्सन भारावून गेले होते. अहमदाबादमध्ये बोरिस जॉन्सन यांच्या स्वागताचे बॅनर्स सर्वत्र लावण्यात आले होते. ते पाहून मी सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन असल्यासारखं वाटत होतं, असं जॉन्सन यांनी म्हटलं.

भारत आणि ब्रिटन कठिण काळात एकत्र आल्याचं बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांनी सुरक्षेच्या संदर्भातील भागिदारी वाढवण्यासाठी चर्चा केल्याचं ब्रिटनच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. दोन्ही देशांमध्ये सुरक्षा विषयक करार झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं. लढाऊ विमानं आणि सागरी क्षेत्रासंदर्भातील तंत्रज्ञान भारताला देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं देखील ते म्हणाले.
परवानगी अभावी कोव्होवॅक्स लस रखडली; आदर पुनावाला यांची सरकारी कारभारावर टीका
बोरिस जॉन्सन यांनी कोरोना विषाणू संसर्गापासून वाचण्यासाठी भारतात निर्मिती झालेली लस घेतली असल्याचं सांगितलं. भारताचे यासाठी आभार मानतो, असं देखील जॉन्सन यांनी म्हटलंय.
load shedding : भारनियमनावरून आता भाजप राज्यात रान पेटवणार!, दरेकरांनी दिला ‘हा’ इशारा
नरेंद्र मोदी यांनी बोरिस जॉन्सन यांच्याशी रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धासंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवणे आणि त्या प्रश्नावर उपाय राजनैतिक मार्गानं प्रयत्न करायला हवेत, या मुद्यावर नरेंद्र मोदींनी भर दिला. आम्ही बोरिस जॉन्सन यांच्याशी बोलताना सर्व देशांचं सार्वभौमत्त्व आणि प्रादेशिक एकता यासंदर्भात भाष्य केलं. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धासंदर्भात भारत सावध भूमिका घेत असल्याचं दिसून आलं आहे. बोरिस जॉन्सन यांनी आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. भारत दौऱ्यात बोरिस जॉन्सन यांनी उद्योगपतींशी देखील चर्चा केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here