मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा जोरदार सिझन सुरू आहे. कतरिना कैफ- विकी कौशल, आलिया भट्ट- रणबीर कपूर यांच्या लग्नानंतर आता आणखी एका लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल लवकरच लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दोघांचेही चाहते त्यांच्या लग्नाची तारीख कधी जाहीर होते, याची आतुरतेने वाट बघत होते. या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू असताना एक नवीनच बातमी आता समोर आली आहे. केएल राहुल आणि अथिया या दोघांनी लग्नाआधीच एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच हे दोघं जण लिव इन रिलेशनमध्ये राहणार आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत आलिशान घर भाड्यानं घेतलं आहे.

राहुल अथिया शेट्टी

एका न्यूज पोर्टललनं दिलेल्या बातमीनुसार अथिया आणि केएल राहुल यांनी बांद्रा येथील कार्टर रोड इथं चार बीएचके ब्लॉक भाड्यानं घेतला आहे. या घराचं भाडं महिना १० लाख रुपये इतकं आहे. चार बीएचके अशा आलिशान घरातून अथांग समुद्राचा नजारा दिसतो.

‘हे ज्याचं त्याचं मत’ अक्षय कुमारच्या माफीनंतर आली अजय देवगणची रिअॅक्शन

दाक्षिणात्य पद्धतीनं होणार लग्न

हे दोघं जरी लिव इनमध्ये रहाणार असले तरी या वर्षाअखेरीस दोघंजण लग्न देखील करणार आहेत. हे दोघंजण दाक्षिणात्य पद्धतीनं लग्न करणार आहेत. राहुल आणि सुनील शेट्टी हे मूळचे मंगलोरचे आहेत.

राहुल अथिया

मित्रांनी केला वेगळाच खुलासा

दरम्यान, अथिया शेट्टीच्या खास मित्रानं बॉम्बे टाइम्सला सांगितलं की, असं काहीच नाही. या दोघांनी लग्नाबाबत अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. कारण सध्या त्यांचं पूर्ण लक्ष त्यांच्या कामावर आहे.

Video :म्हणून छायाचित्रकारांवर भडकली सारा अली खान, पोज द्यायला दिला स्पष्ट नकार

तीन वर्षांपासून आहेत रिलेशनमध्ये

केएल राहुल आणि अथिया गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. प्रारंभी त्या दोघांनी संपूर्ण जगापासून त्यांचं नातं लपवलं होतं. परंतु हळूहळू त्यांनी नातं सर्वांसमोर आणलं. सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोंवर कॉमेन्ट करू लागले. दोघांच्याही आयुष्यातील खास क्षणी ते एकमेकांसोबत दिसले आहेत. अर्थात या सर्वांबाबत दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here