
चाहत्यांचा आक्रमक सूर पाहून मध्यरात्री एक वाजता अक्षयने ट्वीट करत माफी मागितली. आता अक्षयसोबत या जाहिरातीत असलेल्या अभिनेता अजय देवगण याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोणती जाहिरात करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कलाकार तेवढे जबाबदार असले पाहिजेत असं म्हणत मी वेलचीची जाहिरात करतो, असं अजय देवगण म्हणाला आहे.
‘कभी ईद कभी दिवाली’तून अर्शद वारसी, श्रेयस तळपदेचा पत्ता कट?

शरीराला हानिकारक असलेल्या पदार्थांची जाहिरात करण्यावरून आजपर्यंत अनेक कलाकारांना माफी मागावी लागली आहे. आता या पंक्तीत अक्षय कुमारही आला आहे. खरंलतर ज्या जाहिरातीसाठी अक्षय कुमारने माफी मागितली आणि मिळालेले पैसे चांगल्या कामासाठी देण्याचं वचन दिलं. त्या जाहिरातीत अक्षयसोबत अजय देवगण आणि शाहरूख खान हेदेखील होते. पण जाहिरातीचा फोकस अक्षयवर असल्याने तो चांगलाच कात्रीत सापडला. गेल्या काही दिवसांपासून या जाहिरातीचा वाद गाजत असल्याने यावर अजय देवगण याने दिलेल्या प्रतिक्रियेनेही लक्ष वेधलं आहे.

एका मुलाखतीत याच मुद्द्यावर छेडलं असता अजय देवगण म्हणाला, काही उत्पादनं हानिकारक असतात तर काही पौष्टिक व सकस असतात. मी वेलची असलेल्या उत्पादनाची जाहिरात केली आहे. पण जेव्हा माझ्याकडे जाहिरातीची ऑफर येते तेव्हा मी ती गोष्ट हानिकारक नाही ना याचाच विचार करतो. पण, जी उत्पादनं हानिकारक आहेत ती विक्रीसाठी बाजारात येतातच का याचाही विचार केला पाहिजे. तसंच अशा उत्पादनांची जाहिरात करायची की त्याला नकार द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. याबाबत जबाबदारीने निर्णय घेण्याची परिपक्वता कलाकारांमध्ये असलीच पाहिजे. चूक करून माफी मागण्याची वेळ येण्यापेक्षा सुरुवातीलाच विचार करून निर्णय घेतला पाहिजे.
तीन वर्षाच्या लेकीला दूधही दिलं नाही… अंकित तिवारीनं उघड केला पाइव्ह स्टार
दरम्यान तंबाखू असलेल्या पानमसाल्याची जाहिरात केल्याबद्दल अक्षय कुमारने माफी मागितली. भविष्यात कोणतीही जाहिरात स्वीकारण्यापूर्वी त्यातील उत्पादन योग्य आहे की नाही हे तपासून पाहू, असा शब्द बॉलिवूड स्टार अक्षयकुमारने दिला आहे. एकीकडे ज्या तंबाखूजन्य पानमसाल्याच्या जाहिरातीवरून हा वाद सुरू आहे आणि ही जाहिरात करणाऱ्या अक्षय कुमारने जाहीर माफीही मागितली आहे ती जाहिरात मात्र अजूनही दाखवली जात आहे. ती जाहिरात बंद करण्याची मागणीही नागरिक करत आहेत.