विराज आणि शिवानी यांचं ७ मे रोजी पुण्यामध्ये विवाहबद्ध होणार आहेत. दोघांच्याही घरी लग्नसोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. तसंच या दोघांतेही मित्रमैत्रिणी देखील त्यांना केळवणासाठी आमंत्रित करत आहेत. विराजस-शिवानीला अभिनेत्री सानिया चौधरी हिनं तिच्या घरी केळवणासाठी बोलावलं होतं. त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Athiya Shetty आणि KL Rahul नं घेतला लिव-इनमध्ये राहण्याचा निर्णय!

विराजस आणि शिवानीच्या केळवणाचे फोटो सानिया चौधरीनं तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. सानियाची ही स्टोरी शिवानी आणि विराजस यांनी देखील त्यांच्या स्टोरीमध्ये शेअर केली आहे. सानियानं शेअरे केलेल्या पहिला फोटोमध्ये तिनं केळवण असं कॅप्शन देत शेअर केला आहे. तर सानियाचा दुसरा फोटो केवळ शिवानीसह आहे, ज्यावर तिने हार्ट काढलं आहे. सानिया आणि शिवानी यांनी ‘सांग तू आहेस का?’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. याच मालिकेत सिद्धार्थ चांदेकर याचीही मुख्य भूमिका होती. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा अभिनेता विराजस कुलकर्णी यानं ‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे घराघरात लोकप्रियता मिळवली होती.
दरम्यान मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचं एक लेटेस्ट फोटोशूटही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका साडीच्या जाहिरातीसाठी या दोघांनी काम केलं आहे. त्याचेच हे फोटो आहेत. त्या फोटोंमधून दोघींमधील छान बाँडिंग दिसून येत आहे.
लग्नानंतर रणबीरला सोडून आलियाची रणवीर सिंगसोबत ‘प्रेमकहानी’ सुरू