अमरावती : राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा वाद पाहायला मिळत आहे. अशात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. राज्यात इतर महत्त्वाचे मुद्दे असतानाही हनुमान चालीसा म्हणायला मुंबईला गेले आहेत. पण मातोश्रीवर जाण्याइतकी त्यांची उंची नाही. मातोश्रीसमोर पाय ठेवून पाहा, आम्ही शिवसेनेसोबत आहोत असं वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलं आहे.

मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत पोहोचलं आहे. अशातच अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आपण शिवसेनेसोबत खंबीरपणे उभं असल्याची प्रतिक्रिया देत राणा यांच्यावर बोचरी टीका केली. इतकंच नाहीतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणावी हे ठरवणारे तुम्ही कोण? असाही सवाल यावेळी त्यांनी केला.

‘शिवरायांना बदनाम करण्याच्या कटात राज ठाकरेंचाही सहभाग’
याविषयी प्रतिक्रिया देताना राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, ‘आमदार रवी राणा आणि खासदार नवणीत राणा यांचा निवडणुकीचा एक बाप होता आता त्यांनी बाप बदलला आहे. मागील दोन वर्षांपासून सगळे भोंगे बंद होते. फक्त एकच भोंगा सुरू होता, तो अॅम्बुलन्सचा. भोंग्याच्या वादामुळे देशाचा विकास होणार नाही. शिवसेनेच्या वाटेला जायची तुमची लायकी नाही. असंच असेल तर या लढाईत आम्ही शिवसेनेसोबत खंबीरपणे उभं आहोत’ अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

मोठी बातमी! ‘सिल्व्हर ओक’ हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंसह ११५ एसटी कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here