आता तर काय या ओटीटीवर मनोरंजनाचा पाऊस सुरू असतो. अनेकांचा वीकेंड मजेत घालवण्याचं काम करणाऱ्या या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या वीकेंडला कॉमेडीचा वर्षाव होणार आहे. हसून हसून लोटपोट करायला लावणारे निवडक सिनेमे येत्या वीकेंडला ओटीटीवर दाखवण्यात येणार असल्याने कॉमेडीप्रेमी प्रेक्षकांनी येणारा वीकेंड राखून ठेवला आहे.
पुन्हा एकदा सारा तेंडुलकरच्या Video ची चर्चा, चाहत्यांनी लावले भन्नाट अंदाज
शुभमंगल ज्यादा सावधान
लग्न या विषयावर आत्तापर्यंत खूप सिनेमे आले. पण निखळ विनोदातून लग्नातील गमती सांगणाऱ्या शुभमंगल ज्यादा सावधान या सिनेमाने धमाल केली. आयुषमान खुराना याच्या आगळ्या वेगळ्या सिनेमांपैकी हा एक. दोन मुलांमध्ये आकर्षण निर्माण होतं आणि ते प्रेमात पडतात. पुढे लग्न करायचं ठरवल्यानंतर दोघांची फॅमिली त्यांची कशी टर उडवते हे या सिनेमात दाखवलं आहे. ज्या विषयावर बोलायचं म्हटलं तरी बोललं जात नाही तो विषय विनोदी अंगाने मांडण्यात आला आहे. अॅमेझॉन प्राइमवर हा सिनेमा दिसणार आहे.

कागज
झी प्राइमवर रसिकांना कागज हा कॉमेडी सिनेमा पाहता येणार आहे. सामाजिक विषयाला विनोदाची फोडणी दिली तर पडद्यावर कशी धमाल होते, हे दाखवणारा हा सिनेमा आहे. अनेकदा जिवंत माणसाला मृत घोषित केल्याने होणारा सावळागोंधळ आपण अनेकदा बातम्यांमध्ये वाचतो. काही वेळा तो अनुभवतो. असाच कागदावर मेलेला माणूस जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी धडपडतो तेव्हा जो काही विनोद फुलतो ती म्हणजे कागजची कथा. पंकज त्रिपाठी यांनी या सिनेमात अफलातून भूमिका केली आहे.

बाला
टक्कल आहे म्हणून लग्न ठरत नाही ही व्यथा असलेले अनेक लग्नाळू तरूण समाजात आहेत. पण त्यांच्या याच समस्येवर सिनेमा काढून प्रेक्षकांना हसवत एका सामाजिक समस्येच्या वर्मावर बोट ठेवण्याचं काम बाला हा कॉमेडी सिनेमा करतो. डिज्नी प्लस हॉटस्टार या प्लॅटफार्मवर दाखवण्यात येणारा हा सिनेमा विनोदाचा कळस आहे. टक्कल झाकण्यासाठी विग लावून फिरणाऱ्या नायकाला अखेर त्याचं खरं प्रेम कसं मिळतं हे विनोदी शैलीत पाहताना भरपूर मनोरंजन होणार आहे.

हिंदी मीडियम
अमेझॉन प्राइम व्हिडिओवर हिंदी मीडियम हा सिनेमा पाहता येणार आहे. इरफान खान आणि सबा कमर यांचा अभिनय असलेला सिनेमा विनोदाची एक उंची गाठतो. इंग्रजी माध्यम आणि हिंदी माध्यमातील नोकझोक विनोदातून मांडण्यात आली आहे. हा सिनेमाही वीकेएंडला खळखळून हसवणार आहे.

PHOTOS: १० वर्षांनंतर तापसीची ही इच्छा झाली पूर्ण
गोलमाल
रोहित शेट्टी फॅक्टरीतील अस्सल विनोदी सिनेमांचा बाप असलेला गोलमाल हा कधीही कुठेही पाहता येणारा सिनेमा येत्या वीकेंडला अॅमेझॉनवर येणार आहे. एका जोडप्यासोबत चार तरूण फसवेगिरी करायला येतात पण नंतर त्यांच्यातच एक नातं तयार होतं असा इमोशनल ड्रामा फूल टू विनोदाने भरलेला आहे. अजय देवगण, तुषार कपूर, अर्शद वारसी आणी शरमन जोशी यांनी यामध्ये धमाल केली आहे.
