औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणाऱ्या जाहीर सभेला अनेक संघटनांनी विरोध केला आहे. त्यातच आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीसुद्धा एक मोठं विधान केलं आहे. राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिल्यास दंगली घडू शकतात असे मला अनेक सर्वसामान्यांकडून सांगण्यात येत असल्याचं खैरे म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना खैरे म्हणाले की, सभेला परवानगी देण्याबाबत पोलीस आणि संबंधित प्रशासन निर्णय घेतील. पण आम्हाला हे पाहायचं आहे की, ते एक लाख लोकं कसे जमा करतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेचा रेकॉर्ड कुणीही तोडू शकत नाही. मला सर्वसामान्य लोक बोलताना सांगत आहे की, सभा कशासाठी पाहिजे, भोंग्यांचा विषय घेतील तर दंगली होतील. इथे मुस्लिमांची संख्या कमी आहे का? असं चंद्रकांत खैरे म्हणाले. त्यामुळे जर सभा झाली तर वातावरण खराब होऊ शकतं आणि दंगली होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं मला अनेक लोकांनी येऊन सांगितलं असेही खैरे म्हणाले. ‘राणा दाम्पत्याचा निवडणुकीत वेगळा बाप आणि आता वेगळा’, बच्चू कडूंच्या टीकेने खळबळ
भाजपच्या लोकांचे मनसेला सहकार्य…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचं जबरदस्त असं काम सुरू आहे. त्यामुळे हे आमचे जुने मित्र असलेल्या भाजपवाल्यांना पहावलं जात नाही. त्यामुळे त्याचं मनसेला सहकार्य मिळत आहे. तर भाजपचे लोकं गल्ली-गल्लीत जाऊन मनसेच्या सभेला येण्यासाठी लोकांना सांगत असल्याचं मला आमच्या अनेक शिवसैनिकांनी येऊन सांगतील असल्याचं सुध्दा खैरे म्हणाले.