Shivsena vs Rana | नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आपण सकाळी ९ वाजता मातोश्रीवर पोहोचणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांच्या घराबाहेर असणारी शिवसैनिकांची गर्दी पाहता ते मुळात घराबाहेर पडणारच कसे, हा मोठा प्रश्नच आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य कोणता नवा डाव टाकणार का, हेदेखील पाहावे लागेल.

 

Matoshree

Shivsena vs Rana

हायलाइट्स:

  • नवनीत राणा आणि रवी राणा हे पोलिसांना गुंगारा देऊन अमरावतीहून मुंबईत पोहोचले होते
  • मातोश्रीपर्यंत पोहोचण्यासाठी राणा दाम्पत्याकडून अशाच गनिमी काव्याचा वापर होऊ शकतो
मुंबई:नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्री तर सोडाच पण कलानगरच्या सिग्नलवर तर पाय ठेवून दाखवावा, अशा शब्दांत शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला आव्हान दिले आहे. शिवसेनेला आव्हान देणारे असे किती आले आणि गेले. काल शिवसैनिकांनी एकाला ‘प्रसाद’ दिला आहे. आता राणा दाम्पत्यानेही याठिकाणी यावे. आम्ही त्यांना ‘महाप्रसाद’ देण्यासाठी सज्ज आहोत, असे मातोश्रीबाहेरील शिवसैनिकांनी ठणकावून सांगितले.

नवनीत राणा आणि रवी राणा मातोश्रीपर्यंत पोहोचल्यास याठिकाणी शिवसैनिक आक्रमक होऊ शकतात. काल रात्रीच शिवसैनिकांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला होता. शिवसैनिक सध्या अ‍ॅटॅक मोडमध्ये आले आहेत. त्यामुळे आज मातोश्री आणि राणा दाम्पत्याचे निवासस्थान असलेल्या खारमध्ये हायव्होल्टेज ड्रामा रंगण्याची शक्यता आहे.
Shivsena vs Rana: शिवसैनिकांकडून राणा दाम्पत्याची ‘नाकाबंदी’; खारच्या घराबाहेरही ‘फिल्डिंग’ लागली
यापूर्वी नवनीत राणा आणि रवी राणा हे पोलिसांना गुंगारा देऊन अमरावतीहून मुंबईत पोहोचले होते. आतादेखील मातोश्रीपर्यंत पोहोचण्यासाठी राणा दाम्पत्याकडून अशाच गनिमी काव्याचा वापर होऊ शकतो. राणा दाम्पत्याचे निवासस्थान असलेल्या खार परिसरातही शिवसैनकांनी गर्दी केली आहे. ही शक्यता लक्षात घेऊन शिवसैनिक खारच्या इमारतीच्या परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. राणा दाम्पत्याने आपण सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे गनिमी काव्याने याठिकाणी यायचे झाल्यास राणा दाम्पत्य कोणत्याही क्षणी याठिकाणी दाखल होऊ शकते. त्यामुळे शिवसैनिक सध्या मातोश्रीबाहेर डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत.
Tejas Thackeray: तेजस ठाकरे मध्यरात्री मातोश्रीबाहेर पडून शिवसैनिकांना भेटतात तेव्हा…
तर दुसरीकडे पोलिसांनीही मातोश्री परिसरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. मातोश्रीच्या गेटच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. जेणेकरून कोणीही मातोश्रीत शिरण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना ते शक्य होणार नाही. त्यामुळे आता राणा दाम्पत्य काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shiv sena warns navneet rana and ravi rana who will come matoshree to recite hanuman chalisa
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here