धुळे : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज धुळे शहर दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम, प्रकल्पांचे उद्‌घाटने, कार्यारंभ होवून राजर्षी छत्रपती शाहू नाट्यमंदिरात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन केले. याप्रसंगी ते बोलत होते.

‘येणाऱ्या काळात मी टोल नाके बंद करून जीपीएस यंत्रणा उभी करणार आहे. त्यामुळे टोल न भरण्याचं टेन्शनच संपून जाईल. हेच नंदुरबार व धुळे जिल्‍ह्यात करायचे आहे. याच दृष्‍टीने येत्‍या तीन-चार वर्षात दोन्‍ही जिल्‍ह्यातील रस्‍ते हे अमेरिकेच्‍या दर्जाचे असतील’, असे आश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धुळ्यात बोलताना दिले.

शिवसैनिक माझ्या घराच्या दरवाजापर्यंत पोहोचले; उद्धव ठाकरे यांनीच हल्ला करायला सांगितला: रवी राणा
धुळ्यात येतांना माझं मन शांत होतं…

धुळ्यात येतांना माझं मन शांत होतं कारण खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी जी काम सांगितले होती ती कठीण होती. सुलवाडे जामफल योजना पूर्ण झाली. या योजनेच काम पूर्ण झाल्याने माझ्या डोक्यावरील ओझं कमी झाल्‍याचे देखील त्‍यांनी यावेळी बोलताना सांगितले. दुसरे म्हणजे धुळे शहरातील रस्त्यांच्या प्रस्तावावर बोलताना नितीन गडकरी यांनी खोचक टीका करत वक्तव्य केले की ‘धुळे शहरात कॉन्ट्रॅक्टरला रस्त्याचा ठेका दिला जातो तो दिवाळखोरीत जातो, त्यामुळे मला टेन्शन येते की ऑर्डर देऊनही कामे होत नाही. मात्र, मला आनंद आहे की ते सर्व काम पुन्हा सुरू झाले’, असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या ‘पीए’वर गोळीबार, राजकीय कारण असल्याचा आरोप
राजकारणात खोटी आश्वासन देऊन लोकांना मुर्ख बनवू शकत नाही…

‘राजकारणात खोटी आश्वासन देऊन लोकांना मुर्ख बनवू शकत नाही, जे नेते खोट स्वप्न दाखवितात त्‍यांच्‍याबद्दल तात्‍पुरता प्रेम असत आणि जे स्वप्न पूर्ण करून दाखवतात जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते’, असे म्हणत नितीन गडकरी यांनी काहींचे कान देखील यावेळी टोचले.
नागपुरी कूलरपेक्षाही स्वस्त आहेत ‘हे’ Cooler AC, देतात ३० फुटापर्यंत थंड वारा, फीचर्सही जबरदस्त, पाहा डिटेल्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here