मुख्यमंत्री अशोक गहलोत लाकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणाम तसंच गरीब-मजदूर यांच्या आलेल्या उपासमारीमुळे चिंतेत असल्याचं सांगत लॉकडाऊन लवकरच उठवण्याबद्दल विचार करत असल्याचं सांगत आहेत. तर दुसरीकडे, आत्ताच अशा कोणत्याही निर्णयाबद्दल विचार करणंही आततायीपणा ठरेल, असं सचिन पायलट यांचं म्हणणं आहे.
सचिन पायलट यांनी नुकताच सोशल मीडियावर आपली एक मुलाखत जाहीर केलीय. यामध्ये त्यांनी अनेक जिल्ह्यांपर्यंत अद्याप करोना पोहचला नसल्याचं म्हटलंय. परंतु, याचा अर्थ असा नाही की लॉकडाऊन हटविण्याची वेळ आलीय. कोणताही बेजबाबदारपणा परवडणार नाही, असं म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, राजस्थानात करोना संक्रमणात अचानक वाढ झालेली दिसून आलीय गेल्या २४ तासांत १०० हून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. यातील ३९ रुग्ण जयपूरमधून सापडले आहेत. जयपूर आणि जोधपूरमध्ये प्रत्येकी १-१ रुग्णाचा मृत्यू झालाय. ‘अशावेळी लॉकडाऊन लवकरात लवकर उठवण्याचा निर्णय घाईघाईत घेणं योग्य ठरणार नाही. अंतिम निर्णय घेण्यासाठी आपल्याला १४ एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागेल. प्रत्येक दिवशी करोनाबाधितांची संख्या वाढतेय. आपण सेफ झोनमध्ये नाहीत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही’ असं सचिन पायलट यांनी म्हटलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
dating sites online singles dating best online dating websites free sex dating sites online live