धुळे : धुळे शहरातील देवपूर परिसरातील पांझरा नदीवरील एका पुलाखाली अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली की हा खून आहे की आत्महत्या यासाठी जुने धुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.

अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला…

देवपूरातील प्रभात नगर ते भिलाटी दरम्यान असलेल्या पुलाखाली आज सकाळी एका इसमाचा मृतदेह आढळून आला. सदर इसम एकविरादेवी मंदिर परिसरातील असल्याने त्याची ओळखही लागलीच पटली. मात्र, यासंदर्भात खुन झाल्याची अफवा पसरल्याने देवपूर परिसर व जुने धुळ्यातील तरूणांसह नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. सदर मृत व्यक्तिचे नाव अरूण शुक्ल असे असून त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रथमदर्शनी पोलिसांनी अरुण शुक्ल यांच्या मुलाच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Shivsena vs Rana: ‘रिझर्व्हड फॉर बंटी-बंबली’; शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यासाठी आणली अ‍ॅम्ब्युलन्स
कधी घडली ही घटना…

५८ वर्षीय अरूण शुक्ल हे एकविरा देवी परिसरातील बापु भंडारी गल्लीत राहतात. त्यांचा प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. काल सायंकाळी ते सहाच्या सुमारास घरून बाहेर पडले होते. मात्र, रात्री ते घरी परतले नाही. त्यानंतर आज सकाळच्या सुमारास अरूण शुक्ल हे प्रभात नगर ते भिलाटी दरम्यान असलेल्या व कठडे नसलेल्या पुलाच्या कमानीखाली मृतावस्थेत आढळून आले. ही वार्ता परिसरात पोहचल्याने शुक्ल यांच्या नातलगांसह देवपूर पोलिसही घटनास्थळी पोहचले.

घटनास्थळी तसेच नदी पात्रात बघ्याची गर्दी झाल्याने पोलिसांना त्यांना दूर करावे लागले. त्यानंतर ही हद्द आझादनगर पोलिसांची असल्याने लागलीच त्यांना कळविण्यात आले. माहिती मिळताच आझादनगर पोलीस ठाण्यातील चालक हेड काँन्स्टेबल प्रमोद खैरनार व पोलीस काँन्स्टेबल समाधान पाटील हे लागलीच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या उपस्थितीत अरूण शुक्ल यांच्या पार्थिवाला ताब्यात घेऊन शवविच्छदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

‘शिवसेना ट्रॅपमध्ये अडकली, स्वतःहून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार करत आहे’; मनसे नेत्याचं सूचक ट्वीट
पुढील तपास पोलीस करत आहेत…

अरूण शुक्ल यांच्या डोक्याला मागील बाजूस मेंदूजवळ मार लागल्याचे दिसून आले. अरूण शुक्ल पुलावरून जाताना तोल जावून नदी पात्रात पडले. यावेळी पुलाच्या फुटींगचा मार त्यांच्या डोक्याला लागल्याने ते गतप्राण झाले असावेत, असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी मृत अरूण शुक्ल यांचे चिरंजीव कुणाल शुक्ल यांच्या फिर्यादीवरून आझादनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून या घटनेची दखल घेतली असून गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपासही केला जाणार आहे.

शिवसेना पूर्वीपेक्षा कितीतरी मवाळ झालेय, पण शेवटी संयमालाही मर्यादा असतात: जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here