Shivsena vs Rana | पोलिसांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दबाव आणला जात असल्याचा आरोपही नवनीत राणा यांनी केला. गेली दोन वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले नाहीत.

हायलाइट्स:
- राणा दाम्पत्याला डिवचण्यासाठी या परिसरात शिवसैनिकांनी एक रुग्णवाहिका आणली आहे
- शिवसेना नेते संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याचा उल्लेख बंटी-बबली असा केला होता
शिवसैनिकांनी इमारतीला घेराव घातल्यामुळे राणा दाम्पत्याला घरातून बाहेर पडणे शक्य नाही. अशातच आता शिवसैनिकांनी त्यांना डिवचायला सुरुवात केली आहे. आम्ही सकाळी ९ वाजल्यापासून नवनीत राणा आणि रवी राणा यांची वाट पाहत आहोत. आम्हाला त्यांचे स्वागत करायचे आहे. मात्र, आता १२ वाजले तरी ते खाली उतरलेले नाहीत. आम्ही त्यांना खाली उतरल्यावर महाप्रसाद देणार आहोत. हा महाप्रसाद खाल्ल्यानंतर राणा दाम्पत्याला काही उलट्या किंवा जुलाब झाले तर खबरदारी म्हणून आम्ही ही रुग्णवाहिका आणली आहे, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसैनिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीवर जाणारच, असा चंग बांधला आहे. मात्र, शिवसैनिक त्यांच्या निवासस्थानाबाहेरून मागे हटायला तयार नाहीत. तसेच मातोश्रीच्या परिसरातही शिवसैनिकांचा मोठा जमाव आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : shivsena workers bring bunty babli ambulance outside navneet rana and ravi rana residence
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network