मुंबई: नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मातोश्रीवर जाण्याच्या निर्धारामुळे सध्या मुंबईतील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शिवसैनिक हे राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. Enough is Enough! आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी… जय महाराष्ट्र!!, असा मजकूर या ट्विटमध्ये लिहला आहे. त्यामुळे आता शिवसेना राणा दाम्पत्याविरोधात आणखी एखादे आक्रमक पाऊल उचलणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

तत्पूर्वी संजय राऊत यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधतानाही भाजपवर आगपाखड केली होती. आम्हाला धमक्या देऊ नका. राष्ट्रपती राजवट लागेल, केंद्रीय तपास यंत्रणा येतील, या धमक्या देऊ नका. हिंमत असेल तर सीबीआय लावा, ईडी लावा. आम्हाला त्रास द्या. आम्ही तुम्हाला घाबरत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

‘मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न कराल तर शिवसैनिक शांत बसणार आहेत का?’

संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर टीका करत असताना भाजपवरही निशाणा साधला होता. ‘कोणाच्या तरी पाठिंब्याने तुम्ही मुंबई येऊन मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक काय शांत बसणार आहेत का? कायदा-सुव्यवस्थेबाबत तुमच्याकडून सल्ले ऐकून घ्यावेत, अशी वेळ सरकारवर आलेली नाही. तुम्ही तुमच्या पात्रतेत राहा,’ असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

Shivsena vs Rana: ‘रिझर्व्हड फॉर बंटी-बंबली’; शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यासाठी आणली अ‍ॅम्ब्युलन्स

राणांच्या घराबाहेर शिवसैनिकांचं आक्रमक आंदोलन

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या खारमधील घराबाहेर शिवसैनिक सकाळपासून आक्रमक आंदोलन करत आहेत. शिवसैनिकांनी सध्या राणा दाम्पत्य राहत असलेल्या निवासस्थानाला वेढा घातला आहे. शिवसेना आपल्या विरोधकांना डिवचण्यासाठी आंदोलनात जे ‘ट्रेडमार्क’ फंडे वापरते, तसा प्रकार याठिकाणी सुरु झाला आहे. राणा दाम्पत्याला डिवचण्यासाठी या परिसरात शिवसैनिकांनी एक रुग्णवाहिका आणली आहे. या रुग्णवाहिकेवर ‘रिझर्व्हड फॉर बंटी-बंबली’, असा फलक लावण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here