: जिल्ह्यात चोपडा तालुक्यात पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाने गावठी पिस्तूलाची विक्री करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश केला आहे. कारवाईत पथकाने दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून पथकाने ५ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुस, १ चारचाकी आणि २ मोबाईल असा ऐवज हस्तगत केला आहे. मयूर काशिनाथ वाकडे रा.अरुणनगर, चोपडा, अक्रम शेरखान पठाण रा.हरसूल, औरंगाबाद अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. तर यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत.

विशेष पथकाने केली कारवाई…
मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या उमर्टी हे गावठी पिस्तूल आणि काडतुस निर्मिती तसेच विक्रीसाठी प्रसिध्द आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरही या गावाची नोंद आहे. जळगाव जिल्ह्यात गावठी पिस्तूल आणि काडतुसाची विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रिय असून नाशिक परिक्षेत्राचे विशेष बी.जी.शेखर यांनी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना मोहीम राबवून कारवाईच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार एक विशेष पथक देखील तयार करण्यात आले.

६ लाख ८० हजारांचा ऐवज हस्तगत…
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेनच्या हद्दीत काही तरुण गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. माहितीनुसार, पथकाने चोपडा पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसोबत वैजापूर बोरअंजटी रस्त्यावर नाकाबंदी केली. यादरम्यान एम.एम. १९ सी झेड ९१०७ या क्रमांकाच्या कारला थांबवून चौकशी केली असता कारमध्ये गावठी कट्टे व जीवंत काडतूस मिळून आले. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, अरुण नवनाथ सोनवणे रा.निगडी, पुणे व कट्टे देणारा लाखनसिंग मोहसिंग बरनालारा रा.उमर्टी हे दोघे पोलिसांना चकवा देवून फरार होण्यास यशस्वी ठरले. संशयितांकडून १ लाख ५० हजारांचे ५ गावठी पिस्तूल, १० हजारांचे १० काडतूस, एक चारचाकी, २ मोबाईल असा ६ लाख ८० हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. संशयित गावठी कट्टे हे पुण्यात विक्रीसाठी घेवून जात असल्याची माहिती समोर आली आहे

विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे पथकातील पोलीस निरीक्षक बापू रोहम, सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक फौजदार बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे संदीप पाटील, प्रवीण मांडवी, दीपक शिंदे, चोपडा ग्रामीण पोस्टेचे हवालदार शिंगणे, सुनील जाधव, राकेश पाटील यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here