नवनीत राणा आणि रवी राणा यांनी अखेर ‘मातोश्री’बाहेर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याची भूमिका मागे घेतली आहे.

 

navneet rana and ravi rana
नवनीत राणा आणि रवी राणा
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाच्या (Matoshri Bungalow) बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Navneet Rana And Ravi Rana) यांनी आपली भूमिका बदलली आहे. राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मुंबईत काही ठिकाणी तणावाची स्थितीही निर्माण झाली होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आवाहन केल्यानंतरही राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम होते. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी ‘मातोश्री’ परिसरात जाण्याचं टाळलं आहे. याबाबत रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. देशासाठी काम केलेल्या व्यक्तीला यंदापासून लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदाचा हा पहिला पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना जाहीर झाला आहे. हाच पुरस्कार स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी उद्या (रविवारी) मुंबईत दाखल होणार आहेत. मोदींच्या या दौऱ्याला गालबोट लागू नये किंवा हा दौरा रद्द होऊ नये, म्हणून आम्ही आमची भूमिका मागे घेत आहोत, असं रवी राणा यांनी सांगितलं आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : mp navneet rana and mla ravi rana made a big announcement about matoshri hanuman chalisa due to prime minister narendra modi’s mumbai visit
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here