वाचा-
जगभरात जेव्हा मोठ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते तेव्हा त्याचा विमा काढला जातो. विंबल्डन स्पर्धा देखील रद्द झाली. पण त्यांना विमा कंपनीकडून १० हजार कोटी पाऊंड मिळणार आहेत. आता आयपीएल रद्द झाल्यामुळे बीसीसीआयला विमा कंपनीकडून पैसे मिळतील का याबाबत प्रश्न विचारला जात आहे.
वाचा-
यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने देखील आयपीएलसाठी विमा काढला आहे. पण त्यात करोना सारख्या आपत्तीचा समावेश नाही. बीसीसीआयने केलेल्या विमा करारात युद्ध अथवा दहशतवादी हल्ला याचा समावेश आहे. आता करोना व्हायरसमुळे आयपीएल रद्द झाली तर त्यासाठी नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळणार नाही. त्यामुळे फक्त नाही तर आयपीएलशी संबंधीत अन्य लोकांचे नुकसान होणार आहे. यातील सर्वाधिक नुकसान बीसीसीआय आणि स्टार स्पोर्ट्सचे होईल.
वाचा-
बीसीसीआयने आयपीएलसाठी युद्ध आणि दहशतवादी हल्ला या आधारावर विमा करार केला होता. पण या करारात सारख्या जागतिक संकटाचा समावेश नाही. विंबल्डन आयोजकांनी करोना सारख्या संकटाचा समावेश विमा करारात केला होता. त्यामुळे त्यांना विमा कंपनीकडून मोठी रक्कम मिळणार आहे.
वाचा- च्या नावावर
आयपीएल रद्द झाल्यास स्टार इंडियाला ३ हजार २६९.५० कोटी नुकसान होईल. तर बीसीसीआयला विवो कंपनीकडून ४०० कोटी रुपये मिळणार नाहीत. तर अन्य प्रायोजकांकडून बीसीसीआयला २०० कोटी रुपयांचे नुकसान होईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times