ठाणे : उल्हासनगरचा गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजानन मार्केटमध्ये काल रात्री एका चारचाकी वाहन चालकाने आणि त्याच्या तीन मित्रांनी मिळून बाजारात धुमाकूळ घातला. मार्केटमध्ये पार्क केलेल्या अनेक मोटार सायकली, चारचाकी आणि नागरिक उडवले. या घटनेत काही जणांना किरकोळ दुखापतही झाली आहे.
दरम्यान या घटनेनंतर बाजारात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. अशाप्रकारे चुकीची कार चालवणाऱ्या तरुणांना बाजारपेठेत उपस्थित काही लोकांनी विरोध केला असता, चालक व त्याच्या साथीदारांनी दादागिरी केली. हीच बाब पोलिसांना ठाण्याच्या पोलीस कर्मचार्यांनी चार चाकी वाहनांसह काही जणांना ताब्यात घेत अश्रफ युसूफ शेख, तय्यब शेख, सागर मन्सूरी, आशिफ मन्सूरी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून वाहन ताब्यात घेतले तसेच पुढील तपास सुरु केला आहे.