मुंबई : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावेळी विल स्मिथ यानं कॉमेडियन क्रिस रॉक याच्या थोबाडीत मारली होती. त्यानंतर हे प्रकरण खूपच चर्चेत आलं होतं. याप्रकरणानंतर आता विल स्मिथ याच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये देखील वादळ आलं आहे. मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार विल आणि त्याची पत्नी जेडा पिंकेट यांच्या नात्यामध्ये आता तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे हे दोघं जण घटस्फोट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर असं झालं तर हॉलिवूडमधील हा सर्वात महागडा घटस्फोट ठरणार आहे.

हॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट

प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ऑस्करमधील घटनेनंतर विल आणि जेडा यांच्यातील संवाद कमी झाला आहे. याप्रकरणानंतर त्यांच्या नात्यामध्ये तणाव आला आहे आणि हेच त्यांच्या घटस्फोटामागचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या निकटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विल आणि जेडा यांच्यामध्ये अनेक काळापासून वाद सुरू होते. परंतु ऑस्कर सोहळ्यामध्ये घडलेल्या प्रकारानंतर त्यांच्यातील वाद आणि ताण अधिकच वाढला आहे. या संदर्भात मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार जर हे दोघंजण विभक्त झाले तर विलच्या संपत्तीमधील अर्धी संपत्ती जेडाला मिळेल. अभिनेता विल स्मिथ याची एकूण संपत्ती ३५० मिलियन डॉलर म्हणजे दोन हजार कोटी रुपये इतकी आहे. जर या दोघांचा घटस्फोट झाला तर हा हॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट ठरणार आहे. कदाचित या दोघांचा घटस्फोट हा ब्रेट पिट आणि एंजेलिना जॉली यांच्या घटस्फोटापेक्षाही महागडा ठरू शकतो.

अब्जाधीश असूनही अक्षयने केली गुटख्याची जाहिरात, वार्षिक उत्पन्नात शाहरुखला देतो टक्कर

विल जेडा क्रिस

काय घडलं नेमकं?

ऑस्कर सोहळ्यात अभिनेता विल स्मिथ याची पत्नी जेडा पिंकेट-स्मिथ हिच्या आजारपणाची खिल्ली सूत्रसंचालक क्रिस रॉक यानं उडवली होती. त्यानंतर संतापलेल्या विलनं भर कार्यक्रमात स्टेजवर जाऊन क्रिस याच्या कानाखाली मारली होती. या घटनेनंतर विल यानं सोशल मीडियावर पोस्ट करत माफीनामा सादर केला होता. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ‘घडल्या प्रकाराबद्दल मला खेद आहे. या प्रकारामुळे माझी इमेज डागाळली गेली आहे. वास्तविक मी तसा नाही. प्रेम आणि क्षमाशिल अशा या विश्वात हिंसेला जागा नाही. घडल्या प्रकाराबद्दल मी अकादमी, कार्यक्रमाचे आयोजक, सर्व उपस्थित कलाकार आणि हा कार्यक्रम बघणारे जगभरातील सर्व प्रेक्षकांची माफी मागतो. मी विल्यम कुटुंब आणि मेरी किंग रिचर्ड कुटुंबाची माफी मागतो. माझ्या चुकीच्या वागण्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे, त्याबद्दल माफी मागतो.’

‘त्यानंतर मी पुरती कोलमडून गेले होते’, ईशा कोप्पिकरनं सोडलं मौन

थप्पड प्रकरण विलला भोवलं!

ऑस्करच्या मंचावरील थप्पड प्रकरण विल स्मिथला चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणामुळे अभिनेत्यावर दहा वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नाही, तर विल स्मिथचा पुढचा चित्रपट ‘फास्ट अँड लूज’च्या चर्चाही आता पूर्णपणे थांबल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here