मुंबई: करोना व्हायरसच्या या युद्धात सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे आले आहेत. काही कलाकारांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत केली आहे तर अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देऊ केली आहे. अभिनेता अक्षय कुमार यानं पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी २५ कोटींची मदत केल्यानंतरआता मुंबई महानगरपालिकेला तीन कोटींची मदत देऊ केली आहे.

मास्क आणि टेस्टींग किट्ससाठी केली मदत
जगातील अनेक देश करोना व्हायरसशी दोन हात करत आहेत. करोनाला थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील करोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईची लोकसंख्या पाहाता मोठ्या प्रमाणावर लोकांची चाचणी करणं हे आवाहन आहेत. यासाठी टेस्टींग किट्स आणि मास्क कमी पडू नयेत यासाठी अक्षयनं पालिकेला ही तीन कोटींची मदत केली आहे.

वाचा:

वाचा:

दरम्यान, करोना व्हायरसचा आजार राज्यात अधिकच पसरला असून काल एका दिवसात २२९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं राज्यातील करोनाबाधितांची संख्या १३६४ वर जाऊन पोहोचली आहे. यात एकट्या मुंबईतील अर्ध्याहून अधिक रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतील चिंताजनक स्थिती पाहून लॉकडाऊन अधिक कठोर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून त्यासाठी करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या भागात राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here