पुरंदर तालुक्यात वादळवाऱ्यात झाड अंगावर कोसळून एका नवविवाहित जोडप्याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या त्यांच्या सात वर्षीय भाचीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री पिंपळे खेनट मळा येथे घडली.

 

Pune News
वादळवाऱ्यात झाड अंगावर कोसळून दुचाकीवरील तिघांचा मृत्यू

हायलाइट्स:

  • पुरंदर तालुक्यात झाड कोसळून तिघांचा मृत्यू
  • सासवडहून परिंचेकडे दुचाकीवर तिघ जात होते
  • सातच्या सुमारास घडली घटना
पुणे: पुरंदर तालुक्यात शुक्रवारी २२ एप्रिलला पाऊस व वादळवारा सुरू झाला होता. या वेळी परिंचे येथील रेणुकेश गुणशेखर जाधव (वय २९) व त्याची पत्नी सारिका रेणुकेश जाधव (वय २३) यांच्याबरोबर त्यांची भाची ईश्वरी संदेश देशमुख सासवडहून परिंचेकडे दुचाकीवर जात होते. साधारण सातच्या सुमारास पिंपळे येथून जात असताना रस्त्याशेजारील अर्धवट जळलेले वडाचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये रेणुकेश व सारिका यांचा जागीच मृत्यू झाला, तर ईश्वरी गंभीर जखमी झाली होती. बेशुद्धावस्थेत असल्याने ईश्वरीला पुढील उपचारासाठी पुण्यात पाठवण्यात आले होते. मात्र, शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास तिचाही मृत्यू झाला. रेणुकेशचे वडील गुणशेखर जाधव पत्रकार असून, रेणुकेश एकुलता एक मुलगा होता.

Kirit Somaiya vs Shivsena: किरीट सोमय्यांनी आमच्या अंगावर गाडी घातली; शिवसैनिकांची पोलिसांत तक्रार
बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाचा परिणाम…

पुरंदर तालुक्यात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याच्याकडेला असलेल्या धोकादायक झाडांचा वेळोवेळी सर्व्हे करून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. अर्धवट जळालेली तसेच पूर्ण वाळलेली झाडे अनेक ठिकाणी यमदूत म्हणून आजही उभी आहेत. जळालेली किंवा वाळलेली झाडे काढली तर नागरिकांना बांधकाम विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकही त्याकडे दुर्लक्ष करतात. बांधकाम विभागाने रस्ता सुरक्षेबाबत आढावा घेऊन आणखी दुर्घटना होण्याअगोदरच उपाययोजना करणे आवश्यक आहे.

करोना नाही तर ‘या’ आजाराने मुंबईकर चिंतेत, तुम्हालाही लक्षणं दिसल्यास काळजी घ्या!

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : three people on a two wheeler died when a tree fell on them
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here