नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून लावण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा १७ वा दिवस… याच लॉकडाऊनचा परिणाम सध्या करोनाबाधितांच्या संख्येवरही दिसून येतोय. वैद्यकीय क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था ” (ICMR)नं एका अहवालात केंद्राच्या लॉकडाऊनच्या निर्णयाचं कौतुक केलंय. ‘देशात लागू करण्यात आलं नसतं तर इथे इटलीपेक्षाही भयानक अवस्था दिसली असती’ असा दावा आयसीएमआरनं केलाय. लॉकडाऊनअभावी आज करोनाबाधितांची संख्या १५ एप्रिलपर्यंत ८ लाख २० हजारांहून अधिक लोक करोना संक्रमित असते, असंही आयसीएमआरनं म्हटलंय.

आयसीएमआरचा अनुमान R0-2.5 च्या सिद्धांतावर आधारित आहे. भारतात प्रत्येक संक्रमित व्यक्तीनं एका महिन्यात ४०६ लोकांमध्ये या विषाणूचं संक्रमण फैलावलं असतं, असं या सिद्धांताचा अनुमान सांगतो. लॉकडाऊननंतर एक संक्रमित व्यक्तीचं संक्रमण केवळ २.५ लोकांपर्यंत पोहचू शकलं आहे.

या अहवालाचे आकडे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) विकास स्वरुप यांनी परदेशी पत्रकारांना दिले. या अहवालानुसार, भारतात लॉकडाऊननंतर संक्रमणाचा वेग खूपच मंदावलाय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here