Kirit Somaiya | संजय राऊत स्वत:हून बोलत नाहीत. उद्धव ठाकरे जे सांगतात तेच संजय राऊत बोलतात, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. संजय राऊत हे शनिवारी नागपूरमध्ये होते. काल रात्री ते मुंबईत परतले.

 

Kirit Somaiya Uddhav Thackeray
Kirit Somaiya | पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर मी बाहेर पडण्यापूर्वी माझ्यावर हल्ला होऊ शकतो, असे त्यांना सांगितले होते.

हायलाइट्स:

  • माझ्यावरील कालचा हल्ला हा ठाकरे सरकार स्पॉन्सर्ड होता
  • शिवसेनेचे ७० ते ८० गुंड अगोदरच पोलीस ठाण्याबाहेर जमले होते
मुंबई: ठाकरे सरकारने माझा मनसुख हिरेन करायचा प्लॅन आखला होता. पण देव आणि मोदी सरकारच्या कृपेमुळे माझा जीव वाचला. काल शिवसैनिकांनी फेकलेला दगड जरा वरती लागला असता तर मी कायमचा आंधळा झालो असतो, असे वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केले. उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या संगनमताने माझ्यावर हल्ला झाल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला. ते रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
Sanjay Raut: संजय राऊतांचं नवं ट्विट; किरीट सोमय्या आणि राणा दाम्पत्याला पुन्हा डिवचलं
यावेळी त्यांनी खार पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याबाबत भाष्य केले. माझ्यावरील कालचा हल्ला हा ठाकरे सरकार स्पॉन्सर्ड होता. मी पोलीस ठाण्यात रात्री साडेनऊ वाजता येणार असल्याचे अगोदरच कळवले होते. त्यानुसार शिवसेनेचे ७० ते ८० गुंड अगोदरच पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. काहीजण पोलीस स्टेशनच्या आवारात उभे होते. आतमध्ये जातानाही त्यांनी मला शिवीगाळ केली. पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर मी बाहेर पडण्यापूर्वी माझ्यावर हल्ला होऊ शकतो, असे त्यांना सांगितले होते. मात्र, पोलिसांनी आम्ही शिवसैनिकांना दूर नेले आहे, सगळी चोख व्यवस्था केली आहे, असे सांगितले. मात्र, पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच पोलिसांनी मला शिवसेनेच्या गुंडांच्या हवाली केले. या हल्ल्यासाठी पोलीस आयुक्त संजय पांडे हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले.
मातोश्रीत बसलेल्या ‘मर्दांनी’ पोलिसांना फक्त २४ तास रजेवर पाठवावं; नितेश राणेंचं शिवसेनेला आव्हान
या सगळ्यानंतर मी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी गेल्यानंतरही पोलिसांनी माझे म्हणणे नीट ऐकून घेतले नाही. संजय पांडे यांनीच माझा एफआयआर तयार करून पाठवला. तो वाचल्यानंतर मी त्यावर सही करण्यास नकार दिला. मात्र, स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने आता हाच एफआयआर ग्राह्य धरला जाणार, अशा शब्दांत मला दटावले. या सगळ्याविरोधात मी केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार केली आहे. भाजपचे शिष्टमंडळ सोमवारी केंद्रीय गृहसचिवांना भेटण्यासाठी दिल्लीत जाणार आहे, असेही सोमय्या यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bjp leader kirit somaiya press conference takes a dig at shivsena cm uddhav thackeray and police commissioner sanjay pandey
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here