इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी त्यांच्या समर्थकांना खऱ्या स्वातंत्र्यासाठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. शाहबाज शरीफ (Shhe) यांच्या नेतृत्त्वातील सरकारविरोधात इस्लामाबादमध्ये इमरान खान यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. इमरान खान यांना विरोधकांनी अविश्वास ठराव आणत पदावरुन हटवलं होतं. खान यांनी शाहबाज शरीफ यांच्या सरकारच्या परराष्ट्र धोरणावर आरोप केला आहे.
इमरान खानचा भारतावर कौतुकाचा वर्षाव, परराष्ट्र धोरणाचा दाखला देत सत्ताधाऱ्यांना सुनावलं
अमेरिकेनं कटकारस्थान करुन आमचं सरकार पाडलं असल्याचा आरोप इमरान खान यांनी केला आहे. इमरान खान यांचा आरोप अमेरिकेनं फेटाळून लावला आहे. इमरान खान यांनी सत्ता गमावल्याननंतर पेशावर, कराची आणि लाहोरमध्ये मोठ्या सभांना संबोधित केलं होतं. आता शाहबाज शरीफ सरकार विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. इस्लामाबादमध्ये मोठा मोर्चा काढून सरकारला मध्यावधी निवडणुका घेण्यास भाग पाडू, असं शरीफ म्हणाले आहेत.

खऱ्या स्वातंत्र्यासाठी तयारी सुरु करा
इमरान खान यांनी सत्ता गेल्यानंतर पहिली पत्रकार परिषद घेतली. इमार खान यांनी मोर्चाची तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. इमरान खान यांनी पार्टीचे कार्यकर्ते आणि समर्थकांना खऱ्या स्वातंत्र्याच्या तयारीला सुरुवात करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. एक विराट मोर्चा इस्लामाबादमध्ये आयोजित केला जाईल,असा इशारा इमरान खान यांनी केला. आमच्यावर ज्या प्रकारचे सत्ताधीश बसवण्यात आले आहेत, ती फसवणूक आहे, हे लोकांना समजलं आहे, असं खान यांनी म्हटलं आहे.
मारियुपोल बेचिराख करत रशियानं ताबा मिळवला, सॅटेलाईट फोटोतून युद्धाची भीषणता समोर
इमरान खान यांनी गुन्हेगार आणि जामीनावर बाहेर असलेले लोक मंत्रिमंडळात असल्याचा आरोप केला. इमरान खान यांनी नवं सरकार बनवण्यामध्ये अमेरिकेचा हात असल्याचा आरोप केला. इमरान खान यांचं सरकार मित्रपक्षांच्या सहकार्यानं सत्तेत आलं होतं. मात्र, इमरान खान रशियाच्या दौऱ्यावरुन आल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या २० खासदारांनी बंडाची भूमिका घेतली. यानंतर इमरान खान यांनी संसद भंग करत मध्यावधी निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं अविश्वास ठरावावर मतदान घेण्याचा आदेश दिला. त्यानंतर इमरान खान यांना पंतप्रधानपद सोडावं लागलं. इमरान खान यांच्या पक्षाच्या खासदारांनी नॅशनल असेंब्लीमधून राजीनामे दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here