रत्नागिरी : जिल्हयात गेले दोन ते तीन दिवस हवामानामध्ये मोठे बदल झाले आहेत. वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज रविवारी दिवसभर पश्चिम प्रक्षोभामुळे ढगाळ वातावरण व पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अंदाजाप्रमाणे रविवारी सकाळपासून जिल्ह्याभरात बहुतांश ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. दक्षिण रत्नागिरीमध्ये रत्नागिरी या परिसरात पाऊस सुरू आहे. खेड दापोली येथेही ढगाळ वातावरण असून चिपळूण तालुक्यात काही ठिकाणी पावसाला सुरवात झाली आहे.

अनेकदा हवामानात बदल…
अनेकदा या निसर्ग चक्रातील मोठ्या अनपेक्षित बदलामुळे कोकणवासी मात्र चिंतेत पडले आहेत. या हवामानाच्या अलीकडे कोपलेल्या स्थितीमुळे उरला सुरला जो काही आंबा, काजू हाता तोंडाशी आला होता त्याची मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने दैना उडाली बागायतदार मेटाकुटीस आला आहे. तेलंगणा, मध्यप्रदेश येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे कोकणात रत्नागिरी जिल्हयातही त्याचा प्रभाव जाणवत आहे.

महाबळेश्वरतील दापोलीत तापमानाचा पारा ४० अंश…
दोन दिवसांपूर्वी जिल्हयात वाढले होते. मिनी महाबळेश्वर असलेल्या दापोलीत पारा चक्क ४० अंशावर गेला होता. तुलनेत रविवारी सकाळी तापमानात काही अंशी घट जाणवत आहे. पण बंगालच्या खाडीतुन उत्तरेकडे जाणारे वाऱ्यांमुळे हा प्रभाव आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण व पाऊस राहील असा अंदाज आहे. तापमानात झालेली घट ही पश्चिमी प्रक्षोभ कमी होण्याची चिन्हे आहेत. याचा प्रभाव कमी होईल त्यामुळे सोमवारी कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पण हवामानात अनपेक्षित बदल होत आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळपर्यंत कोणता बदल होतो त्यावरच सोमवारी काय स्थिती राहील याचा अंदाज वर्तवण्यात येईल, अशी माहिती डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी या ठिकाणी २४ एप्रिलला सकाळी पावणेसहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वीजांच्या कडकटासह झाल्याचे वृत्त आहे.

167 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here