नवी दिल्ली :रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्धाला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत. रशियानं यूक्रेनवर (Russia Ukraine War) २४ फेब्रुवारीला आक्रमण सुरु केलं होतं. रशियाच्या आक्रमक भूमिकेमुळं अमेरिका, यूरोपियन यूनियनसह अनेक देशांनी कठोर भूमिका घेतली होती. रशियावर निर्बंध (Sanctions on Russia) लादण्यात आले होते. रशियाकडून आंतरराष्ट्रीय निर्बंधांची झळ बसू नये म्हणून उपाययोजना देखील करण्यात आली होती. मात्र, रशियात आता निर्बंधांचे परिणाम जाणवू लागले आहेत. शाहबाज शरीफ सरकारच्या अडचणी वाढणार, खऱ्या स्वातंत्र्यासाठी तयारी करा, इमरान खानचे समर्थकांना आदेश
पाश्चिमात्य देशांनी आर्थिक निर्बंध लावताना रशियाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीवर परिणाम कसा होईल यासाठी रणनीती बनवली होती. रशियाकडून विविध औद्योगिक उत्पादनांची आयात करण्यावर निर्बंध लावण्यात आले होते. रशियानं अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी काही पावलं उचलली होती. यामध्ये व्याजदर २० टक्केपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रशियन उद्योजकांना त्यांच्याकडील संत्ती रुबलमध्ये परावर्तित करण्यास भाग पाडण्यात आलं आहे.

रशियन चलन रुबलचं मूल्य युद्ध सुरु झाल्यानंतर घटलं होतं. मात्र, त्यानंतर रशियानं उचलेल्या पावलानंतर रुबलचं मूल्य वाढलं आहे. केंद्रीय बँकेनं व्याज दर वाढवल्यानंतर थोड्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेतला. रुबलचं मूल्य वाढल्यानंतर रशियाचे राष्ट्रतपी व्लादिमीर पुतीन यांनी पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधाला तोंड देणार असल्याचं म्हटलं.
INS विक्रांत घोटाळा लोकांना विचलित करणारा, जनतेनं दोन दगड मारले तर वाईट काय? संजय राऊतांकडून भाजपला जुन्या भूमिकेचा दाखला
इंडियाना विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक मायकल एलेक्सीव यांनी रशियन सरकार देशातील खरी स्थिती दाखवत नसल्याचं म्हटलं आहे. रशियन अर्थव्यवस्थेचा सूक्ष्मपणे विचार केला असता चित्र वेगळं असल्याचं ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय आर्थिक निर्बंधामुळं रशियन अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक कमी होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. रशियाला गेल्या वीस वर्षातील सर्वाधिक महागाईचा सामना करावा लागत आहेत. महागाईचा दर २००२ नंतर पहिल्यांदा १७. ३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

रशियातील काही कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. लाडा ऑटो सयंत्र बंद झालं आहे. टॅंकची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर देखील परिणाम झाला आहे. मॉस्कोच्या महापौरांनी देशातील परकीय कंपन्यांचं कामकाज बंद झाल्यानं २ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्याचं म्हटलं आहे. रशियामध्ये दूध, भाज्या आणि साखर इत्यादी वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. काही बहूराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांचं रशियातील कामकाज बंद केलं आहे. मात्र, यानंतरही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन युद्ध थांबवण्यास तयार नाहीत.

103 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here