लखनऊ : भाजपमधील (BJP) काही नेते वादग्रस्त वक्तव्यांमुळं सातत्यानं चर्चेत येत असतात. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) उन्नाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार साक्षी महाराज (Sakshi Maharaj) यांनी फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये (Facebook Post) त्यांनी पोलिसांवर टीका केली आहे. तर, नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी धनुष्य बाण आणि कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या सोबत ठेवणयाचं आवाहन केलं आहे. पोलीस भित्रे असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
Sanjay Raut: अपरिपक्व विरोधी पक्षनेत्यामुळे महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था आणि शांतता धोक्यात आलीय: संजय राऊत
साक्षी महाराज त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. साक्षी महाराजांनी केलेल्या नव्या फेसबुक पोस्टमुळं चर्चेला सुरुवात झाली आहे. साक्षी महाराजांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये पोलिसांवर टीका केली आहे. कोणत्याही समुदायाचं थेटपणे नाव घेणं त्यांनी टाळलं आहे.

तुमच्या गल्लीत अचानक जमाव आल्यास तुमच्याकडे वाचण्याचे काय उपाय आहेत. तुमच्याकडे काही उपाय नसतील तर ते करुन घेण्याचं आवाहन साक्षी महाराजांनी केलं आहे. पोलीस तुम्हाला वाचवण्यास येणार नाही तर ते स्वत: वाचण्यासाठी कुठं तरी लपून बसतील. जमावातील जिहाद करुन माघारी गेल्यानंतर ते येतील. काही दिवसानंतर प्रकरण चौकशी समितीसमोर जाईल आणि संपेल, असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे.

घरी येणाऱ्या अशा पाहुण्यांसाठी कोल्ड्रिंक्सच्या एक किंवा दोन पेट्या आणि धनुष्यबाण घरात असावा, असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. साक्षी महाराज यांनी बांग्लादेशमधील एक फोटो देखील ट्विट केला आहे. त्यामधून त्यांचा रोख नेमका कुठं आहे हे समोर येतं.
धक्कादायक! शिलनाथ यात्रेत ५० भाविकांवर मधमाश्यांचा हल्ला, धावपळीत एकाचा दरीत कोसळून मृत्यू

साक्षी महाराज हे भाजपचे खासदार आहेत. साक्षी महाराज यांच्या वक्तव्यांमुळं यापूर्वी वाद निर्माण झाले होते. साक्षी महाराजांची फेसबुक पोस्ट देशभराती विविध ठिकाणी गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर असल्याचंच बोललं जात आहे. हनुमान जयंती आणि राम नवमीला घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर साक्षी महाराजांनी ही पोस्ट केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या आठवड्यात हनुमान जयंतीला दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये दोन समुदायांमध्ये वाद निर्माण झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here