अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अमेरिकेतील द्वीपक्षीय बैठकांमध्ये सहभाग घेतला. याशिवाय त्यांनी बायडन प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. द्वीपक्षीय संबंधाबाबत बोलताना भारत रशिया यांच्यातील संबंधावर भाष्य केलं आहे. भारत आणि अमेरिकेचे संबंध पहिल्यापेक्षा अधिक सुधारले आहेत. यावर कोणीही प्रश्न उपस्थित करत नाही. मात्र, याचवेळी भारत केवळ रशियाकडून शस्त्र खरेदी करत नाही तर गेल्या दशकांपासून दोन्ही देशांचे संबंध असल्याचं निर्मला सितारमण यांनी म्हटलं आहे.
भारत आणि अमेरिकेच्या संबंधात रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्यावर तणाव वाढल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, भारत आणि अमेरिका दोन्ही देशांमध्ये तणावनसून दोन्ही देशांचे संबंध चांगले असून संधी वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणार असल्यानं पाश्चिमात्य देशांनी नाराजी व्यक्त केली होती. अमेरिकेला भारतानं शस्त्र खरेदीसाठीचं रशियावरील अवलंबित्व बंद करावं, असं वाटतं.
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधारत आहेत. सितारमण यांनी भारत आणि अमेरिका हे मित्र आहेत. मात्र, मित्रांच्या भौगोलिक स्थितीला समजून घेण्याची गरज आहे. एका मित्रासाठी दुसऱ्या मित्राला कमजोर करता येणार नाही. अर्थमंत्र्यांनी आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आमच्याकडे कोणताही पर्याय नाही. कोरोनाच्या कारणामुळं उत्तरेकडील सीमेवर तणाव आहे. पश्चिमेकडील सीमेवर सातत्यानं वेगवगळी परिस्थिती निर्माण होते. अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी देण्यात आलेली शस्त्र आमच्याविरोधात वापरण्यात येतात, असं देखील निर्मला सितारमण यांनी स्पष्ट केलं.
भारताकडे आपली भौगोलिक स्थिती बदलण्याची संधी नाही. आम्ही खरोखर अमेरिकेसोबत मैत्री हवी आहे. सितारमण यांनी अमेरिकेला मैत्री करायची असेल तर तो मित्र देखील कमजोर असू शकत नाही, असं निर्मला सितारमण म्हणाल्या. आम्ही निर्णय घेत आहोत, आम्ही आमची भूमिका मांडत आहोत. आम्हाला भौगोलिक स्थितीचं भान ठेवत आपली स्थिती भक्कम करण्याची गरज असल्याचं देखील अर्थमंत्र्यानी म्हटलं आहे.