राज ठाकरे सभा: सभा तर होणारच! मनसेकडून ‘त्या’ मैदानावर व्यासपीठाचे पुजन, उभारणीच्या कामास सुरुवात – mns starts work in aurangabad for raj thackeray meeting
औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी जाहीर सभा घेण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे पोलिसांकडून अजूनही परवानगी मिळाली नाही. पण असे असलं तरीही राज ठाकरेंची सभा होणारच यावर मनसे ठाम असून, रविवारी मनसेकडून सभेच्या ठिकाणी व्यासपीठाचे पुजन करून उभारणीच्या कामास सुरवात करण्यात आली आहे.
राज ठाकरेंच्या सभेच्या तयारीसाठी मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रे गेल्या आठवड्याभरापासून औरंगाबादमध्ये तळ ठोकून आहे. तर गेल्या आठवड्यात त्यांनी मनसेच्या पदाधिकारी यांची बैठक घेऊन सभेबाबत सूचना केल्या. त्यानंतर आता प्रत्यक्षात राज ठाकरे यांच्या सभेची तयारी सुरू झाली असून, रविवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पूजा करून व्यासपीठ उभारणीच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थितीत होते. आता औरंगाबाद ते पुणे गाठा फक्त सव्वा तासात, वाचा कुठून तयार होणार नवा मार्ग?
वाढता विरोध आणि पोलिसांची ‘परवानगी’…
राज ठाकरे यांच्या ०१ मे रोजी होणाऱ्या सभेला होणार विरोध वाढतच चालला आहे. आज आणखी काही संघटना पत्रकार परिषद घेऊन, सभेला परवानगी देऊ नका अशी मागणी करणार आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी अजूनही सभेला परवानगी दिली नसून, दुसऱ्या मैदानाचा पर्याय दिला आहे. असे असताना मनसे मात्र ठरलेल्या ठिकाणी सभा घेण्यावर ठाम आहे.