नागपूर : सकाळच्या नाश्त्यामध्ये गरमागरम उपमा कुणाला आवडणार नाही. जसे नाश्त्याचे, तसेच जेवणाचेही. जेवणात पोळी नाही म्हटले तर चेहरा लालबुंद झाल्याशिवाय राहणार नाही. पोळीविना जेवण ही कल्पनादेखील करवत नाही. या पार्श्वभूमीवर महागलेले आटा, रवा, मैद्याचे दर सामान्यांची चिंता वाढवत आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम म्हणून जागतिक अन्नधान्य बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचा फायदा भारतातील गहू उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मिळत आहे. मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात सुरू आहे. रशिया सर्वात कमी दरात गहू निर्यात करतो. त्यांच्याकडून निर्यात थांबल्याने भारताकडे गव्हाची मागणी वाढली आहे. भारत हा पूर्वीपासून बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि आखाती देशांना गहू निर्यात करत आला आहे. यामध्ये अजून काही राष्ट्रांची भर पडली आहे. वाढत्या जागतिक मागणीच्या पार्श्वभूमीवर २०२२-२३मध्ये गव्हाची विक्रमी एक कोटी टन निर्यात करण्याचे लक्ष्य भारताने निर्धारित केले आहे. एकीकडे निर्यात वाढविली जात असताना दुसरीकडे देशांतर्गत दरवाढ सुरू झाली आहे. याबाबत अधिक सांगताना नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले,’युद्धाचा परिणाम दरवाढीच्या रूपात दिसून येत आहे. गहू, रवा, आटा, मैदा यांचे दर प्रति किलोमागे चार ते पाच रुपयांनी वाढले आहेत.’

आता औरंगाबाद ते पुणे गाठा फक्त सव्वा तासात, वाचा कुठून तयार होणार नवा मार्ग?
किराण्यामधील बाकी महत्त्वपूर्ण वस्तू असलेल्या साखर, बेसन यामध्ये दरवाढ झालेली नाही.

असे आहेत प्रतिकिलो दर

वस्तू-पूर्वीचे दर-आताचे दर

आटा-२४ ते २५-२८ ते २९

मैदा-३३-३६

रवा-३५-४९

सभा तर होणारच! मनसेकडून ‘त्या’ मैदानावर व्यासपीठाचे पुजन, उभारणीच्या कामास सुरुवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here