नागपूर : लग्न मोडल्याने व्यथित पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी धमरपेठ पोलीस वसाहतीत उघडकीस आली. किरण अशोक सलामे (वय ३०) असे मृतकाचे नाव आहे. ते सदर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते.

किरण यांची धरमपेठ वसाहतीत दोन घरे आहेत. पहिल्या माळ्यावरील घरात ते राहायचे. खालच्या माळ्यावर त्यांच्या आई व भाऊ राहतात. त्यांचे एका तरुणीसोबत लग्न पक्के झाले. जानेवारीत ते लग्न मोडले. तरुणीने अन्य एका युवकासोबत लग्न केले. तेव्हापासून किरण तणावात राहायला लागले. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे पहिल्या माळ्यावरील घरात झोपायला गेले. सकाळी खाली आले नाहीत. आईने किरण यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. किरण यांच्या आईने शेजाऱ्याला सांगितले.

आता औरंगाबाद ते पुणे गाठा फक्त सव्वा तासात, वाचा कुठून तयार होणार नवा मार्ग?
शेजाऱ्याने खिडकीतून बघितले असता किरण पंख्याला गळफास घेतलेले दिसले. त्याने सीताबर्डी पोलीसांना माहिती दिली. निरीक्षक अमोल काचोरे यांच्यासह पोलीसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून किरण यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलीसांनी किरण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, असे या चिठ्ठीत लिहिले आहे. सीताबर्डी पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

अन्य एका घटनेत वाडीतील काळे लेआउट येथील मुकुंद निलकंठराव घुमटकर (वय ५२) यांनी पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

चिंता वाढली! अन्नधान्य बाजारात मोठी अस्थिरता, किराण्यातील महत्त्वाच्या वस्तू महागल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here