कराड यावेळी बोलताना म्हणाले की, ‘मी केंद्रात मंत्री झाल्यापासून जिल्ह्यासाठी अनेक प्रकल्प आणले आहेत. पण माझे जुने मित्र माजी खासदार चंद्रकांत खैरे नेहमी सांगतात की मी यासाठी आधी अर्ज दिला होता, हे केलं होतं. त्यामुळे हे असे झाले की, त्यांनी लग्न करायचा विचार केला, पण त्यांनी काही मुलगी पाहिली नाही, मुलगी पसंद केली नाही आणि लग्नही केले नाही. पण आम्ही प्रत्यक्षात काम करून दाखवलं’ असा टोला भागवत कराड यांनी खैरेंना लगावला.
करडांना अजून दिल्ली कळालीच नाही: खैरे
भागवत कराड यांनी केलेल्या टीकेनंतर चंद्रकांत खैरे यांनीही त्यांना उत्तर दिले आहे. कराड आत्ता मंत्री झाले आहेत, त्यांना माहितीच नाही राज्यमंत्र्यांचे अधिकार काय असतात. असे असतानाच उगाच मुद्दाम असं-तसं बोलतात. माझ्याकडे एवढ्या मोठ्या फाईली पडून आहेत. गडकरी माझे मित्र आहे. कराड यांना काहीच माहीत नसून त्यांना अजून दिल्लीच समजली नाही. मी असंच बोलत नाही मी करूनही आणलं असं खैरे म्हणाले.