नवी दिल्ली : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असेलल्या राजकीय गोंधळाचा पुढील अंक आता राजधानी दिल्लीत पाहायला मिळत आहे. पक्षातील नेत्यांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे अन्य काही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. भाजपच्या या शिष्टमंडळाकडून केंद्रीय गृहसचिवांची भेट घेण्यात येणार आहे. या भेटीआधी किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर जोरादार टीकास्त्र सोडलं. (Kirit Somaiya News Today)
ठाकरे सरकारसह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारसह मुंबई पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘माझ्यावर एकदा नव्हे तर तीनवेळा पोलिसांच्या मदतीने हल्ला करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या उद्धटगिरीला सीमा राहिलेली नाही. पोलिसांकडून खोटी एफआर दाखल करण्यात येत आहे. तुम्हाला २० फूट खाली गाडू अशी धमकी शिवसेनेचे प्रवक्ते देतात. या सगळ्या घटनांची आम्ही सविस्तर माहिती केंद्रीय गृहसचिवांना देऊ,’ असं सोमय्या यांनी सांगितलं आहे.