अशी घडली सर्व घटना…
अंबरनाथ पश्चिमेच्या कोहोजगाव परिसरात मुकूल पाल्म नावाची सोसायटी आहे. या सोसायटीत सफायर नावाच्या इमारतीत तळमजल्यावर बांधकाम व्यावसायिक कमरुद्दीन खान यांचं ऑफिस आहे. काल दुपारी साडेबाराच्या सुमारास कमरुद्दीन हे त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असताना ऑफिसच्या खिडकीतून एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. मात्र, या गोळ्या कमरुद्दीन यांना न लागता भिंतीवर लागल्या.
पुढील तपास पोलीस करत आहे…
गोळीबाराची ही घटना ऑफिसच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या प्रकरणात पोलिसांनी आयपीसी ५०६ (२) आणि आर्म्स ऍक्ट ३ (२५) नुसार गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. याप्रकरणी कमरुद्दीन शेख यांनी एका संशयिताचं नाव घेतलं असून याच परिसरातल्या एका जागेवरून कमरुद्दीन खान यांचे गेल्या काही वर्षांपासून दुसऱ्या एका बांधकाम व्यावसायिकासोबत वाद आहेत. त्यामुळे हा हल्ला नेमका त्याच वादातून झाला आहे? की यामागे अन्य काही कारण आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे.