जळगाव : भुसावळ येथून मुंबई येथे ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करतांना झोप लागली आणि त्‍याचा फायदा घेत चोरट्यांनी भुसावळचे भाजपचे नगरसेवक तथा उद्योगपती मनोज बियाणी यांच्या सहकाऱ्यांची तब्बल ४० लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २८ ते २९ मार्च दरम्यान भुसावळ शहरातील एम.जी ग्राऊंड ते मुंबई प्रवास दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी शनिवार २२ एप्रिल रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा घडला सर्व प्रकार…

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे नगरसेवक तथा उद्योगपती मनोज बियाणी यांचे निकटवर्तीय संजय पुरूषोत्तम तिवारी (रा. मधु डेअरी समोर, विठ्ठल मंदिर वॉर्ड भुसावळ) हे संगीतम ट्रॅव्हलच्या एमएच ०३ सीपी- ३४७७ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्समधून पाचशेच्या नोटांनी भरलेली बॅग घेऊन नाशिकला पोहचविण्यासाठी निघाले होते. त्यांनी ही बॅग गाडीच्या डिक्कीत ठेवली होती.

महाराष्ट्रातील नाट्यानंतर दिल्लीत वेगवान घडामोडी; सोमय्या केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला
झोप लागली आणि घडला सर्व प्रकार…

सहकाऱ्यांनी पैश्यांची बॅग डिक्कीत ठेवली खरी मात्र, रात्री त्यांना झोप लागल्याने कुणीतरी अज्ञात चोरट्याने ही बॅग लंपास केली आहे. दरम्यान, या संदर्भात मनोज बियाणी यांनी शनिवार २३ एप्रिल रोजी भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक मंगेश गोटला हे करीत आहेत.

तुमच्यामुळे मुख्यमंत्री घराबाहेर आले, ‘फायर आजींचा’ सत्कार केला पाहिजे; मनसेची खोचक टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here