परभणी : सध्या तरुणांमध्ये राग हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. यामुळे वारंवार गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार परभणीमध्ये समोर आला आहे. इथे एका लग्नाला जाणे जवायला चांगलेच महागात पडले आहे. सासरच्या मंडळींनी आणलेले कपडे का घातले नाही म्हणून जेवण करत असलेल्या जवायच्या डोक्यामध्ये मेव्हण्याने दगड मारून डोके फोडण्याची घटना परभणीच्या पालम तालुक्यातील दिग्रस येथे घडली आहे.

हरिभाऊ बोरकर असे जखमी जावयाचे नाव आहे. तर बळवंत सुरेश कदम या मेहुण्या विरोधात पालम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिभाऊ रंगनाथ बोरकर यांच्या चुलत मेहुण्याचे लग्न पार पडणार असल्याने सासरच्या मंडळींनी हरिभाऊ बोरकर यांना लग्नामध्ये कपडे घेतले. मात्र, घरगुती वादातून हरिभाऊ बोरकर यांनी कपडे घेण्यास नकार दिला.

Weather Alert : आज पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता, वाचा पूर्ण आठवड्याचा वेदर रिपोर्ट
पालम तालुक्यातील दिग्रस येथे आयोजित करण्यात आलेल्या लग्नसमारंभाला त्यांनी उपस्थिती लावली. मात्र, कपडे न घेतल्याचा राग मनात धरून हरिभाऊ बोरकर यांचा मेहूना बळवंत कदम हा हरिभाऊ बोरकर जेवत करत असताना त्यांच्याजवळ आला. आम्ही आणलेले कपडे तुम्ही का घेतले नाहीत असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर हातामधील दगड हरिभाऊ बोरकर यांच्या डोक्यात मारून डोके फोडले. डोक्यात मार लागल्यामुळे हरिभाऊ बोरकर यांना चक्कर आली व ते खाली पडले. त्यांच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पालम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मेहूना बळवंत कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आता औरंगाबाद ते पुणे गाठा फक्त सव्वा तासात, वाचा कुठून तयार होणार नवा मार्ग?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here