परभणी: रात्री दहा वाजेच्या सुमारास नानलपेठ पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आपआपल्या दैनंदिन कामात व्यस्त होते. एवढ्यात ११२ या नंबरवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. ‘साहेब…मला वाचवा हो…माझ्यावर चार व्यक्तींनी बंदूकीने फायरींग केली आहे, असे सांगितले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनेचे गांभिर्य ओळखून तयारीनिशी घटनास्थळ गाठले. परंतू खोदा पहाड, निकला चुहा या प्रमाणे तो कॉल एका इसमाने सहज केल्याचे उघड झाले. पोलिसांना नाहक त्रास देणाऱ्या इसमावर नानलपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. राजेश सोपानराव बहिरट रा. कलावती मंदिर एकनाथ नगर असे गुन्हा नोंद झालेल्या इसमाचे नाव आहे.

माझ्यावर हल्ला करत मारहाण केली आहे…

आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना मदत व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने डायल ११२ हि सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शनिवार २३ एप्रिल रोजी रात्री या सुविधेवर सह.पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट, पोलीस कर्मचारी अजहर सय्यद कार्यरत होते. पोलिसांचे पथक शहरामध्ये गस्त घालत असताना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास राजेश सोपानराव बहिरट याचा कॉल आला. संबंधिताने चार व्यक्तींनी माझ्यावर हल्ला करत मारहाण केली आहे. तसेच बंदूकीने फायरींग केली आहे, असे सांगितले.

तुमच्यामुळे मुख्यमंत्री घराबाहेर आले, ‘फायर आजींचा’ सत्कार केला पाहिजे; मनसेची खोचक टीका
घटनास्थळी पोहोचताचं…

घटनेचे गांभीर्य पाहता पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फोन करणाऱ्या इसमाचा शोध घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. घटनेची शहानिशा करत चौकशी केली असता संबंधिताने सहज फोन केला असून अशी कोणत्याही प्रकारची घटना घडली नाही, असे सांगितले. राजेश सोपानराव बहिरट रा. कलावती मंदिर एकनाथ नगर याने खोटी माहिती दिल्याने संबंधितावर अजहर सय्यद यांच्या तक्रारीवरून नानलपेठ पोलीसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील नाट्यानंतर दिल्लीत वेगवान घडामोडी; सोमय्या केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here