पहिल्या रांगेत भाजप प्रभारी मकरंद देशपांडे, आमदार राम सातपुते, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार रमेश जिगजीणगी, डॉ.सिद्धेश्वर महास्वामी, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार सुभाष देशमुख, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, बबनराव शिंदे, बसवनगौडा पाटील, सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल आणि पालिका आयुक्त पी शिवशंकर आदी पहिल्या रांगेत बसले होते. त्यांच्या पाठीमागच्या रांगेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे विराजमान झालेले पाहायला मिळाले. विशेष गोष्ट म्हणजे केवळ खुर्च्या रिकाम्या असल्यामुळेचं पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना पुढं बोलावण्यात आले.
या नियोजित कार्यक्रमात भाजप प्रभारी मकरंद देशपांडे यांच्या नावाचा कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख नसताना फक्त भाजप पदाधिकारी असल्याने त्यांना पहिल्या रांगेत मान दिला गेला. तर दुसरीकडे या कार्यक्रमाला पालकमंत्री दत्तात्रय भरणे अन माढ्याचे आमदार बबनराव शिंदे वगळता महाविकास आघाडीतील आमदारांनी पाठ फिरवली होती. राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड, यशवंत माने, शिवसेनेचे शाहजी पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.