पॅरिस : फ्रान्सचे (France) विद्यमान राष्ट्रपती इम्यॅनुएल मॅक्रॉन ( Emmanuel Macron) यांनी मरीन ले पेन (Marine Le Pen) यांना पराभूत केलं आहे. इम्यॅनुएल मॅक्रॉन यांनी मरीन ले पेन यांचा पराभव केल्यानं आता ते दुसऱ्यांदा फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होतील. राष्ट्रपती निवडणूक प्रक्रिया संपत असतानाचा फ्रान्समध्ये आता संसदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. फ्रान्समध्ये संसदीय निवडणूक जून महिन्यात पार पडेल. ही निवडणूक इम्यॅनुएल मॅक्रन यांच्यासाठी पहिली चाचणी आहे.
श्रीलंकेत विद्यार्थ्यांचा पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव, राजपक्षेंच्या राजीनाम्यासाठी जोरदार घोषणाबाजी
मरीन ले पेन यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इम्यॅनुएल मॅक्रॉन यांना कडली लढत दिली आहे. मरीन ले पेन यांना ४१ टक्के मतं मिळाली आहेत. ही दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली सर्वाधिक मतं आहेत. मरीन ले पेन यांनी त्यांच्या समर्थकांना मार्गदर्शन करताना जूनमध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकीसाठी तयार असल्याचं मरीन ले पेन यांनी म्हटलं.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर मॅक्रॉन यांच्यासमोर पहिलं आव्हान जून महिन्यात होणाऱ्या संसदेच्या निवडणुका आहेत. निवडणुका जवळ आल्यामुळं फ्रान्समधील राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. मॅक्रॉन हे यूरोपियन यूनियन समर्थक मानले जातात. अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणूक विजय, यूरोपियन यूनियनमधून ब्रिटनच एक्झिट या कारणामुळं फ्रान्समध्ये राष्ट्रवादी नेत्यांचा उदय झाला. मात्र, येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये मॅक्रॉन यांच्यासमोर मरीन ले पेन यांचं आव्हान आहे. मरीन ले पेन यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सार्वजनिक ठिकाणी हिजाबबंदीचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, मॅक्रॉन यांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाबबंदी लागू करणार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, शाळा आणि महाविद्यालयात हिजाबबंदी लागू असेल, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
रशिया यूक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे मंत्री झेलेन्स्कींच्या भेटीला, मॉस्कोच्या भूमिकेकडे लक्ष
मॅक्रॉन यांनी २०१७ मध्ये मरीन ले पेन यांचा पराभव केला होता. मात्र, यावेळी मॅक्रॉन यांच्या विजयाचं अंतर कमी झालं आहे. मॅक्रॉन यांच्यापूर्वी दोन नेत्यांना राष्ट्रपती म्हणून काम करण्याची दुसरी संधी मिळाली होती. इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांना विविध देशांच्या प्रमुखांकडून निवडणुकीतील विजयानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here